विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक; थेट राज्यपालांना पाठवला मेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:10 PM2024-03-05T14:10:48+5:302024-03-05T14:22:36+5:30
याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आला. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मेलद्वारे करण्यात आली होती. याबाबत राहुल नार्वेकरांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अशा प्रकारच्या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यपाल कार्यालयाकडून राहुल नार्वेकर यांनी पाठवलेल्या ईमेलबाबत विचारणा केली असता, असा कोणताच मेल मी पाठवला नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.