वादग्रस्त विधाने टाळून सरकार सामोपचाराने चालवा - मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:05 AM2020-01-24T06:05:11+5:302020-01-24T06:05:37+5:30

राज्यात ती पक्षांचे सरकार असल्याने काही मुद्द्यांवर मतभेद होतील. मात्र आपण विचारधारेशी तडजोड न करता सामोचाराने सरकार चालवावे. कोणीही वादग्रस्त विधाने करू नयेत

Avoid controversial statements and run the government in a civil way - Mallikarjun Kharge | वादग्रस्त विधाने टाळून सरकार सामोपचाराने चालवा - मल्लिकार्जुन खरगे

वादग्रस्त विधाने टाळून सरकार सामोपचाराने चालवा - मल्लिकार्जुन खरगे

Next

मुंबई : राज्यात ती पक्षांचे सरकार असल्याने काही मुद्द्यांवर मतभेद होतील. मात्र आपण विचारधारेशी तडजोड न करता सामोचाराने सरकार चालवावे. कोणीही वादग्रस्त विधाने करू नयेत, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील नेते आणि मंत्र्यांना सूचना दिल्या.
टिळक भवन येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री यांची बैठक खरगे यांच्या उपस्थितीत झाली. मात्र या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हजर नव्हते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेच राज्यात प्रमुख आहेत. त्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत, असे स्पष्ट करत समन्वय समितीत काँग्रेसकडून थोरात व अशोक चव्हाण असतील, असे खरगे यांनी सांगितले.
राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांना काँग्रेसचे पालकमंत्री आहेत. उर्वरित २४ जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नाहीत. प्रत्येक मंत्र्याने असे दोन दोन जिल्हे वाटून घ्यावेत व तेथे संपर्क मंत्री म्हणून२२ काम पाहावे, सरकारच्या निर्णयप्रक्रियेत तुमचे प्रतिबिंब दिसले पाहिजे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरुद्ध कोणी बोलत असेल तर त्यांना कडाडून विरोध करा; मात्र तुम्हीदेखील बोलताना सांभाळून बोला, असा कानमंत्रही खरगे यांनी दिला.

आम्हाला विश्वासात घ्या - थोरात

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असो की मुंबईतील नाइटलाइफचा निर्णय. अशा निर्णयात काँग्रेस पक्षाला सामावून घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Avoid controversial statements and run the government in a civil way - Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.