'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:47 PM2024-08-10T12:47:00+5:302024-08-10T12:49:33+5:30

Uddhav Thackeray : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षांनी जोरदार तयारी केली असून ठाकरे गटानेही दौरे वाढवलेत.

Banners against Uddhav Thackeray have been put up in Thane | 'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर

'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर

 Uddhav Thackeray :  राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षांनी जोरदार तयारी केली असून ठाकरे गटानेही दौरे वाढवलेत. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेठाणे दौऱ्यावर येणार आहेत. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेनेच्या भगवा सप्ताहानिमित्त ते येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत ठाणे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी ठाण्यात बॅनरबाजी सुरू असल्याचे दिसत आहे. या बॅनरवरुन ठाकरे यांना डिवचले असून बॅनरवर कुणाचेही नाव नाही. 

मराठा आरक्षणावर निर्णय होणार? 'मराठा -ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार'; अजित पवारांची माहिती

एकीकडे काल उद्धव ठाकरे गटाकडून कोणी पक्ष चोरला असे बॅनर लावले होते, तर दुसरीकडे आज  ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे 'घालीन लोटांगण' या आशयाचे बॅनर लावले आहेत.  या बॅनरवर कुणाचेही नाव नाही.  यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही बॅनर एकाच रस्त्यावर आणि समांतर रेषेत आहेत, यामुळे लोकांच्या नजरा दोन्हा बॅनरवर पडतात. 

या बॅनरवती 'घालीन लोटांगण, वंदिन चरण..' हा आशय आहे. यात खासदार शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या समोर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संजय राऊत यांचा फोटो आहे. 

उद्धव ठाकरेंनी केला दिल्ली दौरा

३ दिवसीय दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. भाजपासोबत युती तुटल्यापासून ठाकरे आणि गांधी कुटुंब एकमेकांच्या जवळ आले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केली. 

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय काय झालं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. 
पुढील महिन्याच्या आत जागावाटप केलं जावं, त्यावरही चर्चा झाली
कोण किती जागा लढणार यावर सर्वांची सहमती झाली पाहिजे, जर काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला तर एकत्र बसून तोडगा काढला जाईल
जागावाटपानंतर सर्वांनी मजबुतीने एकसाथ प्रचारासाठी पुढे यायला हवं.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विभागवार आकड्यांच्या आधारे सर्वाधिक मतांची टक्केवारीला प्राधान्य दिलं जावं. 

Web Title: Banners against Uddhav Thackeray have been put up in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.