कोट्यवधी खर्च; तरी सिंचन क्षमता का वाढली नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:20 AM2018-09-20T01:20:03+5:302018-09-20T01:20:29+5:30
खासदार अशोक चव्हाण यांचा सवाल
मुंबई : गेल्या चार वर्षात ६४ हजार कोटींंपेक्षा अधिक खर्च करूनही सिंचन क्षमतेत वाढ झाली नाही. हा देखील घोटाळाच समजायचा का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.
२०१३-१४ पर्यंत राज्यावर जवळपास २ लक्ष ६९ हजार ३४५५ कोटी रूपयांचे कर्ज होते. केवळ चार वर्षात या सरकारने दुप्पट कर्ज घेतले. जानेवारी २०१५ मध्ये श्वेतपत्रिका काढून काँग्रेसच्या कार्यकालातील आर्थिक परिस्थितीचा ऊहापोह केला गेला होता. जे मुद्दे चुकीचे म्हणून दर्शवले होते त्याच मुद्यावर विद्यमान सरकार उघडे पडले.
आम्ही एकदाच तुटीचा अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा संपूर्ण सभागृह डोक्यावर घेणाऱ्या भाजपने सलग दोन वर्ष तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. गतवर्षी ४ हजार ५११ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात सुधारित अंदाजान्वये ही महसूली तूट १४ हजार ८४४ कोटीपर्यंत गेली होती. यावर्षी प्रत्यक्षात १५ हजार ३७४ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.