जागावाटपावर आघाडीत मंथन  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:45 AM2018-09-27T03:45:08+5:302018-09-27T03:45:19+5:30

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत महाआघाडी आणि जागावाटपावर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मंथन झाले.

 Binding on the shear of the seat | जागावाटपावर आघाडीत मंथन  

जागावाटपावर आघाडीत मंथन  

Next

मुंबई  - येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत महाआघाडी आणि जागावाटपावर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मंथन झाले.
दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बुधवारी रात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, छगन भुजबळ, माणिकराव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आदी या वेळी उपस्थित होते. समविचारी पक्षांची जागावाटपाच्या प्रस्तावांवर या वेळी चर्चा झाली. जागावाटपांवर अंतिम निर्णय झाला नसला तरी भाजपाच्या विरोधात महाआघाडी करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन कोणी कोणते लोकसभा मतदारसंघ लढवायचे यावर चर्चा झाल्याचे समजते.

Web Title:  Binding on the shear of the seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.