Lakhimpur Kheri Violence: “संजय राऊतजी, महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार?”; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 01:01 PM2021-10-04T13:01:49+5:302021-10-04T13:03:38+5:30

संजय राऊत आणि नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

bjp keshav upadhye replied shiv sena sanjay raut and congress nana patole over lakhimpur incident | Lakhimpur Kheri Violence: “संजय राऊतजी, महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार?”; भाजपचा सवाल

Lakhimpur Kheri Violence: “संजय राऊतजी, महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार?”; भाजपचा सवाल

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील शेतकरीद्रोही राज्य सरकारबद्दल कधी बोलणार? ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू सध्या सुरू आहे

मुंबई:उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर उसळलेल्या राड्यामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून, काही आंदोलक शेतकरी जखमी झाले आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, संजय राऊत आणि नाना पटोले महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार, अशी विचारणा करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye replied shiv sena sanjay raut and congress nana patole over lakhimpur incident)

उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संबंधित परिसरात सरकारविरोधातील रोष वाढला आहे. या प्रकरणानंतर आता देशभर संतापाची लाट उसळताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना चिरडणे ही भाजप आणि पंतप्रधान मोदींची अधिकृत 'पॉलिसी' आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यानंतर नाना पटोले यांनीही या प्रकरणावरून निशाणा साधला. याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार?

संजय राऊत व नाना पटोले हे लखीमपुरवरून टीका करत आहेत, ती चर्चा करूच पण महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही राज्य सरकारबद्दल कधी बोलणार? ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले असून अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्यास कवडीचीही मदत न देता पाठ फिरविणारे हे सरकार. मुख्यमंत्री तर बाहेर पडत नाहीतच पण पालकमंत्रीही साध भेटायला गेले नाहीत. आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू सध्या सुरू आहे. वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहे, आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली आहे.

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, लखीमपूर खिरी घटनेचा तपास आता  एसटीएफकडे वर्ग करण्यात आला आहे. एसटीएफने तपासाची सूत्रे हाती घेईल. हिंसाचारानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन पोलिसांनी २४ जणांची ओळख पटवली आहे. यासोबतच पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहेत. यापूर्वी, या प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टोनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह १४ जणांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट यांसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
 

Web Title: bjp keshav upadhye replied shiv sena sanjay raut and congress nana patole over lakhimpur incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.