"पुन्हा चारही पक्ष वेगवेगळे लढूया; कोणाच्या जागा जास्त येतात बघू"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 07:04 PM2020-07-13T19:04:13+5:302020-07-13T19:08:08+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कोल्हापुर/मुंबई: मागील विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वातंत्र निवडणूक लढवली असती तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० आणि काँग्रेसच्या फक्त १० जागा निवडून आल्या असत्या, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जे १०५ आमदार निवडून आले, त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. शिवसेनेची साथ नसती तर भाजपच्या आमदारांचा आकडा ४० ते ५० पर्यंत खाली घसरला असता, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
CoronaVirus News: पुणे, ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही लॉकडाऊन?; आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पावसात भिजण्यापासून सगळे करून झाले. त्यानंतर देखील राज्याच्या निवडणुकीत कोणाच्या किती जागा निवडून आल्या ते सर्वांनी पाहिले आहे. निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वातंत्र निवडणूक लढवली असती तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० आणि काँग्रेसचा फक्त १० जागांवर विजय झाला असता, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच कुणाची किती ताकद आहे ते बघायचे असेल तर पुन्हा सगळे वेगवेगळे लढू. चारही पक्ष वेगवेगळे लढूया. कुणाच्या जागा जास्त येतात ते बघू, असं आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदार कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. हे सरकार बदलणार नाही, असा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरंतर, आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाही. काहीतरी गडबड होईल अशी त्यांनाच सारखी भीती वाटते, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
'शरद पवार तुम्हाला मुलाखत देतात की नाही बघूया'; संजय राऊतांचे फडणवीसांना आव्हान
दरम्यान, भाजपाचे लोक आता सांगतात की १०५ आमदार असतानाही शिवसेनेनं आम्हाला दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं. पण भाजपाला १०५ पर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेनेनंच केलं होतं. त्यांनाच गृहीत धरण्याची भूमिका भाजपानं घेतली. मागच्या पाच वर्षात भाजपानं शिवसेनेला जवळपास बाजूला सारलं होतं, असं शरद पवारांनी सांगितले. शिवसेनेला गप्प कसं करता येईल हेच पाहिलं गेलं. त्यामुळं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतरांनी वेगळं काही करण्याची आवश्यकताच नव्हती,' असा टोलाही शरद पवारांनी लगावला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या-