'...म्हणून लक्ष वळविण्यासाठी सचिन सावंत यांनी हा उद्योग केला असावा'; भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 05:28 PM2020-08-25T17:28:42+5:302020-08-25T17:28:49+5:30

भाजपा महाराष्ट्र प्रदेश तर्फे 24 ऑगस्ट 2020 रोजी राज्यातल्या सर्व पत्रकारांना ओबीसी मोर्चा कार्यकारिणी यादीची पीडीएफ प्रत ई- मेलवरून पाठवण्यात आलेली आहे.

BJP leader Keshav Upadhyay has criticized Congress leader Sachin Sawant | '...म्हणून लक्ष वळविण्यासाठी सचिन सावंत यांनी हा उद्योग केला असावा'; भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर

'...म्हणून लक्ष वळविण्यासाठी सचिन सावंत यांनी हा उद्योग केला असावा'; भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर

Next

मुंबई: भाजपाकडून या बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपचा वापर होत असल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं होतं. तसेच भाजपाच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा फुगा फुटला असून भाजपा गद्दार असल्याची घणाघाती टीका सचिन सावंत यांनी केली होती. सचिन सावंत यांच्या या टीकेनंतर आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेस पक्षाने चीन सोबत कोणता करार केलेला आहे याची माहिती देण्याऐवजी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पार्टीवर तद्दन खोटे, फुटकळ आरोप केले आहेत. प्रदेश भाजपाकडून बंदी घातलेल्या कोणत्याही अॅपचा वापर केलेला नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे स्टंट करण्यापूर्वी आपल्याकडील माहितीचा शहानिशा तरी करा, असा सल्ला भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला आहे.
 
केशव उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, भाजपा महाराष्ट्र प्रदेश तर्फे 24 ऑगस्ट 2020 रोजी राज्यातल्या सर्व पत्रकारांना ओबीसी मोर्चा कार्यकारिणी यादीची पीडीएफ प्रत ई- मेलवरून पाठवण्यात आलेली आहे. ही प्रत तपासण्याची तसदीही न घेता अर्धवट माहितीच्या आधारावर सचिन सावंत यांनी भाजपावर आरोप केले आहेत. पत्रकार मंडळीही त्यांना मिळालेल्या प्रसिद्धी पत्रकाची प्रत तपासू शकतात.
 
ज्या पक्षाच्या माजी अध्यक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल प्रकरणी खोटे आरोप केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयापुढे माफी मागावी लागली होती. त्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्याने प्रसिद्धीसाठी असे खोटे बोलावे याचे नवल वाटत नाही, असं केशव उपाध्ये यांनी सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सध्या जो तमाशा चालू आहे. त्यामुळे या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे देशभर हसे होत आहे. त्यावरून लक्ष वळविण्यासाठी सचिन सावंत यांनी हा उद्योग केला असावा, असेही केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजपाच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा फुगा फुटला असून भाजपा गद्दार असल्याची घणाघाती टीका सचिन सावंत यांनी केली होती. महाराष्ट्र भाजपाने जारी केलेलं एक प्रसिद्ध पत्रक सावंत यांनी ट्विट करत निषेध केला होता. 

"जाहीर निषेध! गद्दार महाराष्ट्र भाजपा मोदी सरकारने बंदी घातलेले कॅमस्कॅनर अ‍ॅपचा अजूनही राजरोसपणे वापर करत आहे. चीनी अ‍ॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपाचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे स्पष्ट आहे" असं म्हणत सचिन सावंत यांनी कॅमस्कॅनने शेअर केलेली यादीचे फोटो ट्विट केले आहेत. मोदी सरकारने चीनी कंपन्यांच्या अ‍ॅप्स वापरावर भारतात बंदी घातलेली असताना त्यांचाच भाजपा बंदी घातलेली चीनी अ‍ॅप्स आजही वापरत असून भाजपाची ही कृती प्रचंड चिड आणणारी आहे. बंदी घातलेले चीनी अ‍ॅप वापरून भाजपाने चीनबद्दल आजही प्रचंड प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे असं देखील म्हटलं होते. 

Web Title: BJP leader Keshav Upadhyay has criticized Congress leader Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.