"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:03 AM2018-10-24T05:03:34+5:302018-10-24T05:03:44+5:30

शिवसेना व भाजपाचे काही खासदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. अनेक चांगली माणसं चुकीच्या पक्षात गेली होती, ती आता परत येऊ इच्छितात.

"BJP-Sena MPs come in contact with us, Khadse Congress comes to Anand" | "भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच"

"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच"

Next

मुंबई : शिवसेना व भाजपाचे काही खासदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. अनेक चांगली माणसं चुकीच्या पक्षात गेली होती, ती आता परत येऊ इच्छितात. त्यांना काँग्रेसमध्ये सन्मानाने प्रवेश दिला जाईल. योग्यवेळी त्यांची नावे जाहीर करू, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपा नेते एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांनाही प्रवेश देऊ असेही ते म्हणाले.
अनेक जण भाजपात गेले खरे पण तेथे गेल्यावर मिळणारी वागणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोज खोटे बोलण्याने ते कंटाळले आहेत. दरम्यान, विद्यमान खासदार परत आल्याने काँग्रेस, राष्टÑवादीच्या जागा वाटपावर त्याचा काहीही वाईट परिणाम होणार नाही, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा
या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनही भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. याचाच अर्थ या योजनेत घोटाळा झाला आहे, असा आरोप खा. चव्हाण यांनी केला.

Web Title: "BJP-Sena MPs come in contact with us, Khadse Congress comes to Anand"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.