१५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:44 PM2023-07-13T13:44:47+5:302023-07-13T13:45:37+5:30

आज भाजपच्या बैठकीत आगामी विधानसभेच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.

BJP will win more than 152 seats, 220 seats of Grand Alliance will be elected; Claim of Chandrasekhar Bawankule | १५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

१५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

googlenewsNext

मुंबई-  महाराष्ट्रात भाजपने दोन मोठ्या विरोधी पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतील अजित पवारांसह ३० हून अधिक आमदार भाजपसोबत सरकारमध्ये आहेत. दरम्यान, आज महाराष्ट्र भाजपची बैठक बोलावण्यात आली, यामध्ये आगामी निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. भाजपच्या या बैठकीत काही पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, पहिले पोस्टर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे होते, यामध्ये भाजपने १५२ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. 

पुन्हा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटील यांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्या प्रशिक्षण वर्गात प्रत्येक बुथवर प्रत्येकजण महत्वाचा घटक आहे. प्रत्येक समाजापर्यंत आम्ही जाणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारची विकासकामे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. राज्यात महायुतीच्या २२० जागा निवडून येतील. महाविजय २०२४ चा आम्ही संकल्प केला आहे, असंही बावनकुळे म्हणाले. 

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत १५२+ जागांवर दावा करणारे देवेंद्र फडणवीस यांचे एक मोठे पोस्टर महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत दिसले. त्याचबरोबर या पोस्टरमध्ये मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांचाही उल्लेख आहे. पोस्टरमध्ये देवेंद्र फडणवीस १५२+ याकडे बोट दाखवताना दिसत आहेत.

आता भाजपने स्वतःसाठी १५२ हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे, पण आता यासंदर्भात नवीन वाद सुरू होऊ शकतो. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत, त्यामुळे एकटा भाजप १५२ जागांवर दावा करत असेल, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा मिळतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राज्यात आता जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे.  अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटपावरूनही नवा वाद निर्माण होऊ शकतो.

Web Title: BJP will win more than 152 seats, 220 seats of Grand Alliance will be elected; Claim of Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.