केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

By ravalnath.patil | Published: October 9, 2020 10:12 PM2020-10-09T22:12:24+5:302020-10-09T22:18:58+5:30

Balasaheb Thorat :मुंबईतील गांधी भवन येथे बाळासाहेब थोरात यांनी आज  राज्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.

Black laws brought by the central government are unfair to farmers and workers: Balasaheb Thorat | केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

Next
ठळक मुद्दे'मुंबई हे कामगार चळवळीचे महत्त्वाचे केंद्र आहे.''कामगार कायद्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत.'

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे, त्यांच्यावर अन्याय करणारे असून फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

मुंबईतील गांधी भवन येथे बाळासाहेब थोरात यांनी आज  राज्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला. यावेळीभाजपा सरकारने संसदीय नियम व लोकशाहीला पायदळी तुडवून लोकसभा व राज्यसभेत कृषी कायदे व कामगार कायदे मंजूर केले. हे दोन्ही कायदे कामगार व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत. त्यामुळेच आज विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत या संदर्भात चर्चा केली, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

याचबरोबर, कामगार कायद्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मुंबई हे कामगार चळवळीचे महत्त्वाचे केंद्र आहे. कामगारांना महत्वाचे स्थान हे सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी खूप प्रयत्न, संघर्ष करावे लागले आहेत. कामगारांना कायद्याचे संरक्षण देण्याचे काम सुरुवातीला महाराष्ट्रातच झाले. काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कामागारांसोबत असून त्यांना संरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष या काळ्या कायद्याविरोधात संघर्ष करत राहील, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हणाले.

दरम्यान, विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये कामगार नेते आ. भाई जगताप, विश्वास उटगी, इंटकचे कैलाश कदम, दिवाकर दळवी, निवृत्ती देसाई, ऑल इंडिया ट्रेड युनियनचे कृष्णा भोयर, उदय चौधरी, सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे सईद अहमद, हिंद मजदूर सभेचे सुधाकर अपराज व संजय वढावकर, एक्टू चे उदय भट व विजय कुलकर्णी, AIUTUC चे अनिल त्यागी, राज्य सरकार एम्पल कन्फेडरेशनचे विश्वास काटकर, भारतीय कामगार सेना महासंघाचे संतोष चाळके, न्यू ट्रेंड युनियन (NTUI ) चे श्रीयुत एम. ए. पाटील व श्री मिलिंद रानडे, श्रमिक एकता संघाचे दिलीप पवार, ट्रेड युनियन सेंटर ऑफ इंडियाचे अॅड संजय संघवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.
 

Web Title: Black laws brought by the central government are unfair to farmers and workers: Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.