ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 04:27 PM2022-10-30T16:27:50+5:302022-10-30T16:29:00+5:30

आज प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गेंच्या अभिनंदनाचा ठराव पास झाला. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी मनोगत व्यक्त करत खर्गे यांचे अभिनंदन केले.

Block President to National President can happen only in Congress Party says Balasaheb Thorat | ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात

ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात

Next

मुंबई: आज प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गेंच्या अभिनंदनाचा ठराव पास झाला. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी मनोगत व्यक्त करत खर्गे यांचे अभिनंदन केले. मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे. ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष  हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. 

५० वर्षांचा ससंदीय कार्याचा प्रदिर्घ अनुभव खर्गे यांना आहे. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. काँग्रेस पक्षाचा ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. खर्गे यांच्या नेतृत्वाखाली व सोनियाजी गांधी, राहुलजी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, असंही थोरात म्हणाले.

कडू-राणा वाद! प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या, काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार; कडू यांचा गौप्यस्फोट

 काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून देऊन एक इतिहास घडवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी, कुशल प्रशासक व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाखाली काँग्रेस देशात पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त केला आहे.   
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पक्षकार्यालय टिळक भवन येथे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, मल्लिकार्जुन खर्गे यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक कामगार कुटुंबातील व्यक्ती देशातील सर्वात जुन्या पक्षाचा अध्यक्ष होतो ही ऐतिहासिक घटना आहे. काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे. राहुलजी गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारावे असा विनंती प्रस्ताव महाराष्ट्रासह इतर प्रदेश काँग्रेस कमिटींनीही केला होता पण त्यांनी तो नाकारून पक्षातीलच इतर व्यक्तीने अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी अशी भूमिका घेतली होती. 

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, 
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीने पक्षात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. खर्गे यांच्यासारख्या प्रदिर्घ अनुभवी नेत्याची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे, खर्गे यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची बारकाईने माहिती आहे, त्यांच्या अध्यक्षपदाचा फायदा महाराष्ट्रालाही होईल.

या बैठकीत भारत जोडो यात्रेविषयी चर्चा झाली असून महाराष्ट्रात ही पदयात्रा यशस्वी करून देशात एक वेगळा संदेश देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पदयात्रेने देशातील वातावरण बदललेले असून जगानेही भारत जोडो यात्रेची दखल घेतलेली आहे. ही एक ऐतिहासिक पदयात्रा असून केवळ काँग्रेस पक्षाची यात्रा नसून समविचारी पक्षाचे लोक, संघटना यांचाही सहभाग वाढत आहे. लोकशाहीला माननाऱ्या प्रत्येकाचा या पदयात्रेला पाठिंबा आहे. ही पदयात्रा महाराष्ट्रात ७ तारखेला प्रवेश करत असून मोठ्या संख्येने सहभागी होऊन पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.  

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व सांस्कृतिक विभागाने भारत जोडो यात्रेसंदर्भात तयार केलेल्या दोन गीतांचे अनावरण प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Block President to National President can happen only in Congress Party says Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.