दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:04 IST2025-04-08T16:42:45+5:302025-04-08T17:04:40+5:30

Bombay High Court: दिशा सालियान प्रकरणातील वकील निलेश ओझा यांना हायकोर्टाने फटकारले आहे.

Bombay HC initiated contempt proceedings against Satish Salian lawyer Nilesh Ojha | दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई

दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई

Disha Salian Case: दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टाकडे केली होती. या याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांनी शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. गँगरेपनंतर दिशाची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. वकील निलेश ओझा हे सतीश सालियान यांची बाजू कोर्टात मांडत आहे. मात्र आता कोर्टाने वकील निलेश ओझा यांना चांगलेच फटकारले आहे. हायकोर्टाने ओझांविरोधात अवमान कारवाई सुरू केली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर पत्रकार परिषदेदरम्यान विद्यमान न्यायाधीशांविरुद्ध अपमानास्पद आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने मंगळवारी अधिवक्ता नीलेश ओझा यांच्याविरुद्ध स्वतःहून अवमानाची कारवाई सुरू केली आहे. दिशा सालियान प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकांसदर्भात वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन काही विधाने केली होती. १ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निलेश ओझा यांनी न्यायमूर्ती रेतवी मोहिते-ढेरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

निलेश ओझांनी केलेल्या आरोपींच्या क्लिप आज हायकोर्टात सादर करण्यात आल्या. त्यावर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निलेश ओझा यांना चांगलेच फटकारले. निलेश ओझांनी न्यायव्यवस्थेवर केलेली माध्यमातील विधाने हटवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. निलेश ओझांनी केलेली विधाने न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचे हायकोर्टाने म्हटलं.

"प्रथमदर्शनी या विधानांवरून गुन्हेगारी अवमानाचा खटला सुरू होतो. आम्ही रजिस्ट्रीला ओझा यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देतो," असे कोर्टाने म्हटलं. तसेच हायकोर्टाने युट्यूब आणि एका मराठी वृत्तवाहिनीला पत्रकार परिषदेचा व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आणि भविष्यात तो अपलोड करण्यासही मनाई केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

Web Title: Bombay HC initiated contempt proceedings against Satish Salian lawyer Nilesh Ojha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.