धावत्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धाला बेदम मारहाण; पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जामीन देण्यास कोर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:58 PM2024-10-22T16:58:43+5:302024-10-22T16:59:08+5:30
धावत्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धाला मारहाण करणाऱ्या आरोपीचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
Bombay High Court : नाशिकमध्ये महिन्याभरापूर्वी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना गोमांस बाळगल्याच्या संशयाखाली एका वृद्धाला जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये चार ते पाच तरुणांनी वृद्धाला मारहाण करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओप्रकरणी पोलीस भरतीसाठी मुंबईला येणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता या प्रकरणातील एका आरोपीला मुंबईउच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. जामीन अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाने ताशेरे देखील ओढले आहेत.
धुळे – सीएमएमटी एक्स्प्रेसमध्ये २८ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. जळगावमधील एक वृद्ध प्रवासी कल्याणमध्ये आपल्या मुलीला भेटण्यासाठी एक्स्प्रेसने प्रवास करत होता. नाशिक रेल्वे स्थानक गेल्यानंतर वृद्धाचा बसण्याच्या जागेवरून तरूणांशी वाद झाला. त्यानंतर या तरुणांनी वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर तरुणांनी वृद्धाच्या सामानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान आपण म्हशीचे मांस घेऊन जात असल्याचे वृद्धाने सांगितल्यानंतर तरूणांनी वृद्धाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाव शेअर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
त्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं होतं. तिघेही पोलीस भरतीसाठी मुंबईला जात होते. कोर्टाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तरुणाला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. या तरुणावरही एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ७१ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. तरुणाला अटकपूर्व जामीन न देण्याचा निर्णय देताना ज्येष्ठ नागरिकावर क्रूर हल्ला झाल्याचे म्हटलं. आकाश आव्हाड, नितेश अहिरे, जयेश मोहिते अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
न्यायमूर्ती आरएन लड्ढा यांनी १८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं की, या प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे आरोपी आकाश आव्हाडची कोठडीत चौकशी करण्याची गरज भासू शकते. अटकपूर्व जामीन दिल्याने तपास प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. कथित गोमांसाच्या बरणीवरून पीडितेला आकाश आव्हाडसह पाच ते सहा अज्ञात लोकांनी मारहाण केली. अर्जदाराने माहिती देणाऱ्यावर हल्ला केला आणि त्याच्या मोबाइल फोनवर हल्ल्याचे रेकॉर्डिंग केले आहे, असेही न्यायालयाने म्हटलं.
आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयात पुन्हा अटक होईल ही भीती असल्याचे आरोपीने म्हटलं आहे. "त्याला भीती वाटत आहे की पोलीस त्याला पुन्हा अटक करू शकतात कारण पोलिसांनी जाणूनबुजून शब्द, हावभाव किंवा वस्तूंद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याचे आणि दरोडा टाकणे आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर दुखापत करण्याचे नवीन आरोप जोडले आहेत," असे आरोपीच्या वकीलाने कोर्टात सांगितले.
आले की, त्याला भीती वाटत होती की पोलीस त्याला पुन्हा अटक करतील कारण BNS अंतर्गत, पोलिसांनी हेतुपुरस्सर शब्द, हावभाव किंवा वस्तूंद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरोडा किंवा गंभीर दुखापत करणे दुखापत करण्याचे नवीन आरोप जोडले गेले आहेत.