प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा, हायकोर्टाने मंजूर केला अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 01:05 PM2022-04-12T13:05:55+5:302022-04-12T13:07:41+5:30
Anticipatory Bail Granted to Praveen Darekar : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबई बँकेचे संचालक होण्यासाठी भाजप नेते दरेकर यांनी मजूर सोसायटीचे बोगस सदस्यत्वाचा आधार घेतला. ते मजूर असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून मजूर श्रेणीतून मुंबइ बँकेची निवडणूक लढवली.
मुंबई - बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आज उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असून भाजप नेते प्रवीण दरेकर यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईउच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.
आवश्यतेनुसार ते तपास यंत्रणेसमोर हजर राहतील आणि तपासासाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे सार्वजनिक डोमेनवर उपलब्ध आहेत. त्यासाठी त्याच्या कोठडीची गरज नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयाने आज नोंदवले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबई बँकेचे संचालक होण्यासाठी भाजप नेते दरेकर यांनी मजूर सोसायटीचे बोगस सदस्यत्वाचा आधार घेतला. ते मजूर असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून मजूर श्रेणीतून मुंबइ बँकेची निवडणूक लढवली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने दरेकरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. तपास अधिकाऱ्याला पुरविलेल्या चुकीच्या माहितीमुळे हे आरोप करण्यात आले आहेत. अर्जदार ११ ते १५ डिसेंबर २०१७ आणि १८ ते २२ डिसेंबर २०१७ दरम्यान नागपूरलाच होते. बाकीचे महिने ते मुंबईतच मजूर म्हणून काम करत होते, असे दरेकर यांच्या याचिकेत म्हटले आहे.