Maharashtra Politics: भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रातच काँग्रेसचे दोन गट पडतील; भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 10:29 AM2022-11-06T10:29:20+5:302022-11-06T10:30:01+5:30

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा महाराष्ट्रात येणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केले होते.

By the second phase of Bharat Jodo Yatra two factions of Congress will fall in Maharashtra itself BJP leader Ashish Shelar claim | Maharashtra Politics: भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रातच काँग्रेसचे दोन गट पडतील; भाजपा नेत्याचा दावा

Maharashtra Politics: भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रातच काँग्रेसचे दोन गट पडतील; भाजपा नेत्याचा दावा

googlenewsNext

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा महाराष्ट्रात येणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचेही (Congress) आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. आरोप प्रत्यारोप झाले. या पार्श्वभूमिवर काल भाजपचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार यांनीही एका मुलाखतीदरम्यान काँग्रेसचे दोन टप्पे पडतील असं वक्तव्य केले आहे, त्यामुळे आता काँग्रेसचेही आमदार फुटणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics: “विद्यमान शिंदे सरकार कोसळेल म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत”

एका वृत्तवाहिनेची मुलाखतीवेळी आमदार आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केले. भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडतील असा गौप्यस्फोट आमदार आशिष शेलार यांनी केला. यात्रेतील पहिल्या टप्प्यातील नेते दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत. दुसऱ्या टप्प्या पर्यंत काँग्रेसमध्येच दोन टप्पेच पडतील. जे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात नेतृत्व करत आहेत. ते दुसऱ्या टप्प्यात कोणत्या पक्षात असणार हे पाहाच, असंही आशिष शेलार म्हणाले. 

...म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत”

शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेला संघर्ष, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका यासह नाराजीच्या कारणांवरुन विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल, असे दावे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केले जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनीही याबाबत अनेक भाकिते केली आहेत. मात्र, यातच आता शिंदे सरकार कोसळेल म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. 

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील २२ नाराज आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. हे २२ आमदार कुठले आणि कोण आहेत, यासंदर्भात चंद्रकांत खैरे यांनी सांगितले नाही. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पराभव होईल. छगन भुजबळ, नारायण राणे पडले. मग एकनाथ शिंदेही निवडणुकीत पडणार. फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर शिंदे गटातील सर्वचे सर्व ४० आमदारांचा पराभव होईल, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला. 

Web Title: By the second phase of Bharat Jodo Yatra two factions of Congress will fall in Maharashtra itself BJP leader Ashish Shelar claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.