मंत्रिमंडळाची बैठक पार; उद्धव ठाकरे अन् अजित पवारांच्या उपस्थितीत घेतले ७ महत्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:22 PM2021-12-08T14:22:56+5:302021-12-08T14:23:05+5:30

आज मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक पार पडली.

Cabinet meeting passed; 7 important decisions taken in the presence of CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar | मंत्रिमंडळाची बैठक पार; उद्धव ठाकरे अन् अजित पवारांच्या उपस्थितीत घेतले ७ महत्वाचे निर्णय

मंत्रिमंडळाची बैठक पार; उद्धव ठाकरे अन् अजित पवारांच्या उपस्थितीत घेतले ७ महत्वाचे निर्णय

googlenewsNext

मुंबई: महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, मुला-मुलीचं वसतिगृह आणि इतर नवीन निवासी इमारती बांधण्यासाठी 95.15 कोटी रुपये आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. आज मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडी सरकारने विविध निर्णय घेतले. 

आज 8 डिसेंबर 2021 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात-

  • नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता.जि.नागपूर) येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी  (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
  • कोविड 19 पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार. 
  • (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
  • महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय. (कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग)
  • महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम- 2 (g) (iv) आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 (da) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)
  • बाजार समित्या मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग)
  • शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

Web Title: Cabinet meeting passed; 7 important decisions taken in the presence of CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.