६० दिवस अगोदर बुक करता येईल ST ची सीट, परिवहन मंत्र्यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:51 PM2019-07-24T15:51:22+5:302019-07-24T16:03:07+5:30

गणपती उत्सवासाठी २७ जुलैपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी 

Can be booked 60 days in advance ST bus ticket, divakar rawate decision | ६० दिवस अगोदर बुक करता येईल ST ची सीट, परिवहन मंत्र्यांचा निर्णय

६० दिवस अगोदर बुक करता येईल ST ची सीट, परिवहन मंत्र्यांचा निर्णय

Next
ठळक मुद्देगणपती उत्सवासाठी २७ जुलैपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा  बसेसची सोय केली आहे.

मुंबई - गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानांचे व येतानांचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची घोषणा मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष, श्री. दिवाकर रावते यांनी दिली. याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना देखील होणार आहे.  

एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा  बसेसची सोय केली आहे. या बसचे आरक्षण २७ जुलै (२६ जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरु होणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना जाता-येता चे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. (यापूर्वी ती ३० दिवस होती) साहजिकच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे  राहण्याची आता आवश्यकता राहणार नाही. २७ तारखेपासून सुरु होणाऱ्या या आरक्षण सुविधेमुळे जाण्याबरोबर परतीचे आरक्षण सुद्धा मिळाल्यामुळे त्यांचा गणपती उत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे. 

सदर तांत्रिक बदल संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये  करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया २६ जुलै रोजी संध्याकाळी ४:०० ते मध्यरात्री ००:३० पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकिट काढणे अथवा रद्द करणे हि प्रक्रिया करता येणार नाही. २६ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे. तरी सदर बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले  आहे. 
 

Web Title: Can be booked 60 days in advance ST bus ticket, divakar rawate decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.