युतीचा गड भेदण्याचे काँग्रेससमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:52 AM2019-04-01T03:52:20+5:302019-04-01T03:52:55+5:30

प्रभाव कुणाचा, यातच रंगणार राजकारण । दिग्गजांचा कस आणि स्थानिक समस्यांवर निवडणुकीचा डाव रंगणार

Challenge before Congress to divide the alliance | युतीचा गड भेदण्याचे काँग्रेससमोर आव्हान

युतीचा गड भेदण्याचे काँग्रेससमोर आव्हान

Next

सन १९९० ते २००९ आणि २०१४ ते आजमितीस १५९ दिंडोशी विधानसभा मतदार संघात मतदारांनी युतीला साथ दिली आहे. १९९० ते २००९ पर्यंत विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी येथून आमदार म्हणून नेतृत्व केले असून १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपद भूषविले आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत येथून काँग्रेसचे माजी आमदार राजहंस सिह यांनी आमदार म्हणून येथून नेतृत्व केले होते. मात्र, २०१८ मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. २००९ मध्ये प्रभू यांचा पराभव झाला होता.

२०१४च्या निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना २९४०६ मतांची आघाडी येथून मिळाली होती. कीर्तिकर यांना ७५,७३६, गुरुदास कामत यांना ४६,३३०, मनसेचे महेश मांजरेकर यांना १५,१७२, तर आपच्या मयांक गांधी यांना ५,१३१ मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणाला युती तुटली आणि शिवसेना व भाजप एकमेकांच्या विरोधात लढले. या निवडणुकीत आमदार सुनील प्रभू यांना ५६,५७७ मते मिळाली त्यांनी काँगेसचे माजी आमदार राजहंस सिंग यांचा १९,८२८ मतांनी पराभव केला. राजहंस सिंग यांना ३६,७४९, भाजपच्या मोहित कंबोज यांना ३६,१६९ तर मनसेच्या शालिनी ठाकरे यांना १४,६६२ इतकी मते मिळाली होती.

२०१७च्या पालिका निवडणुकीत विधानसभा पाठोपाठ सेना व भाजप युती तुटली होती. यावेळी पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ३, भाजप ५, शिवसेना पुरस्कृत अपक्ष १ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १ असे एकूण ९ नगरसेवक दिंडोशी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. या मतदार नागरी निवारा वसाहत, न्यू म्हाडा वसाहत, संतोषनगर, कुरार गाव, बाणडोंगरी, तानाजीनगर, शिवाजीनगर, दत्तवाडी, लक्ष्मणनगर, आनंदनगर, पिपंरीपाडा, कोकणीपाडा, जानूभोयेनगर, पठाणवाडी हे प्रमुख भाग मोडतात.


राजकीय घडामोडी
च्२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर याना येथून २९,४०६ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे येथून त्यांना जास्त आघाडी मिळण्यासाठी युतीने कंबर कसली आहे.
च्शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांची थेट लढत ही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्याबरोबर आहे. त्यामुळे येथे युतीचा अभेद्य गड भेदण्याची काँग्रेसची खरी कसोटी लागणार आहे.

दृष्टिक्षेपात राजकारण
दिवंगत गुरुदास कामत आणि माजी आमदार राजहंस सिंग २००९ ते २०१४ पर्यंत त्यांचा येथे मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. आता येथे गेली ५ वर्षे कीर्तिकर खासदार आहेत. त्यातच माजी आमदार राजहंस सिंग हे भाजपवासीय झाले. त्यामुळे युतीच्या बालेकिल्ल्यात संजय निरुपम यांची येथे खरी कसोटी लागणार आहे.
गेली साडेचार वर्षे शिवसेना व भाजपत सौख्य नव्हते. १७ फेब्रुवारीला युतीची घोषणा झाली. सेना भाजपच्या मनोमिलनाचे दर्शन २८ रोजी गोरेगाव येथील युतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात झाले. त्यामुळे येथे युतीची ताकद वाढली असून, त्यांचा लाभ कीर्तिकर यांना मिळणार आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे महेश मांजरेकर यांना येथून १७,७७२ इतकी मते मिळाली होती. यंदा मात्र मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातच नाही.
 

Web Title: Challenge before Congress to divide the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.