राजकीय उपसमितीचे चव्हाण निमंत्रक, थोरातांना वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 11:03 AM2023-02-12T11:03:52+5:302023-02-12T11:04:17+5:30

अधिवेशनासाठी काँग्रेसच्या समित्या जाहीर

Chavan convenor of political sub-committee, excluded Thorat | राजकीय उपसमितीचे चव्हाण निमंत्रक, थोरातांना वगळले

राजकीय उपसमितीचे चव्हाण निमंत्रक, थोरातांना वगळले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रायपूर येथे नियोजित राष्ट्रीय अधिवेशनासाठी विविध समित्या जाहीर करण्यात आल्या असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे राजकीय व्यवहार उपसमितीचे निमंत्रक पद सोपविण्यात आले आहे. सोबतच मसुदा समितीमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश एकाही समितीत करण्यात आलेला नाही. दुसरीकडे नाना पटोले यांना शेतकरी व कृषी उपसमितीचे सदस्य करण्यात आले आहे.

२४ ते २६ फेब्रुवारीच्या दरम्यान रायपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी गठीत केलेल्या विविध समित्यांची यादी शनिवारी राष्ट्रीय महासचिव खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केली. अशोक चव्हाण यांच्यासमवेत खासदार मुकुल वासनिक व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही मसुदा समितीचे सदस्य असतील. वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपसमितीचे अध्यक्षपदही देण्यात आले आहे. डॉ.मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी केंद्रामध्ये याच विभागाचे मंत्रिपद सांभाळले होते.

थोरात यांचा समावेश नसल्याने चर्चा
नाराज असलेले बाळासाहेब थोरात यांचा या समितीमध्ये समावेश नसल्याने चर्चा रंगली आहे. त्यांच्या ‘ना’राजीनाम्यामुळे की त्यांच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांचा समितीमध्ये समावेश नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

अशा आहेत समित्या!  प्रणिती शिंदेंनाही संधी
nराजकीय व्यवहार उपसमितीमध्ये माजी मंत्री नसिम खान व आमदार यशोमती ठाकूर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. 
nआर्थिक व्यवहार उपसमितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, आमदार प्रणिती शिंदे व माजी मंत्री आमदार नितीन राऊत यांना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
nखासदार मुकुल वासनिक अध्यक्ष असलेल्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपसमितीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ. विजय वडेट्टीवार सदस्य आहेत.

 

Web Title: Chavan convenor of political sub-committee, excluded Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.