छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 07:26 AM2023-11-18T07:26:13+5:302023-11-18T07:26:33+5:30

सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ मागील अनेक वर्षे ओबीसी चळवळीत काम करत आहेत, त्या माध्यमातून ते बोलले असावेत. पक्षाची ती भूमिका नाही.

Chhagan Bhujbal aggressive; Ajit Pawar group's dilemma | छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी

छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) अडचण झाली आहे. भुजबळांनी या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थनही करू शकत नाही आणि भुजबळ ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या विधानांचा विरोधही करू शकत नसल्याने पक्षाची एक प्रकारे कोंडी झाली आहे.

भुजबळांच्या आक्रमक विधानांबाबत पत्रकारांनी विचारले असता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ मागील अनेक वर्षे ओबीसी चळवळीत काम करत आहेत, त्या माध्यमातून ते बोलले असावेत. पक्षाची ती भूमिका नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण द्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवारांचे चांगले ट्युनिंग आहे. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा कपोलकल्पित आहेत, असा दावाही तटकरे यांनी यावेळी केला.

Web Title: Chhagan Bhujbal aggressive; Ajit Pawar group's dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.