मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 07:11 PM2024-11-21T19:11:16+5:302024-11-21T19:14:00+5:30

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed Case: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणातील एका आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

chhatrapati shivaji maharaj statue accident case in malvan accused chetan patil granted bail by high court | मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed Case:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावरून राज्यात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीने महायुती सरकारवर घणाघाती टीका केली होती. या प्रकरणी चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील एका आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी मुंबई न्यायायलयात सुनावणी पार पडली. त्यामध्ये चेतन पाटील याला दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे. २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सल्लागार असलेल्या चेतन पाटील याला अटक करण्यात आली होती. चेतन पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता. पुतळ्याचा स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यामुळे चेतन पाटील यांना या प्रकरणात गोवण्यात आलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथील पुतळा कोसळल्यामागची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीने पुतळा उभारणीतील अनेक त्रुटींवर बोट ठेवले होते. या पुतळ्याचा ढाचा कमकुवत होता, वेल्डिंगही दोषपूर्ण होते आणि पुतळा गंजलेला होता, असे समितीच्या अहवालात म्हटले. समितीने १६ पानांचा अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. त्यात पुतळा कोसळण्याची कारणे नमूद करण्यात आली होती. 

मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा ६० फूट उंच तलवारधारी पुतळा राज्य शासन उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली. पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महिनाभरात सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली. काम पूर्ण करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. कामात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी राज्य शासनाने ५०० पेक्षा जास्त पानांचे निकष असणारी निविदा प्रसिद्ध केली. नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आयुर्मान सुमारे १०० वर्षे इतके असणार आहे. १० वर्षे या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदाराने करायची आहे, असे निविदेत म्हटल्याचे सांगितले जात आहे.
 

Web Title: chhatrapati shivaji maharaj statue accident case in malvan accused chetan patil granted bail by high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.