...तर आपण काय करणार?; उद्धव ठाकरेंनी शाळा सुरु करण्यासंबंधी केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 05:34 PM2020-08-26T17:34:56+5:302020-08-26T17:46:00+5:30

सोनिया गांधीनी आयोजित केलेल्या या बैठकित जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्द्यांवरही चर्चा केली.

Chief Minister Uddhav Thackeray has expressed concern over starting a school in the state | ...तर आपण काय करणार?; उद्धव ठाकरेंनी शाळा सुरु करण्यासंबंधी केलं मोठं विधान

...तर आपण काय करणार?; उद्धव ठाकरेंनी शाळा सुरु करण्यासंबंधी केलं मोठं विधान

Next

मुंबई/ नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधला. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. 

सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत कोरोनासह शाळेच्या प्रश्नावरही चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे शाळा सुरु केल्यानंतर आपल्याकडे देखील अमेरिकेसारखी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

सोनिया गांधीनी आयोजित केलेल्या या बैठकित जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. ममता बॅनर्जींनी इंजिनिअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमासाठी केल्या जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे.

Poll: सीईटीचं करायचं काय?... परीक्षा घ्यावी की कायमची रद्द करावी?

तत्पूर्वी, कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक केले. तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी केलेल्या कौतुकाचे आभार मानत मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की त्यांना घाबरून राहायचं हे आधी ठरवलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी या बैठिकित मांडले.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम सुरु केले आहे. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसशासित 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यात काँग्रेसचे 4 तर इतर पक्षांचे 3 मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह  तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे; सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची डरकाळी

मुख्यमंत्री ठाकरेंना डोंबिवलीत फेरफटका मारा म्हणणाऱ्या राजू पाटलांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत

'शहरातील खड्ड्यांचा त्रास मलाही झाला'; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली उघड नाराजी

Read in English

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray has expressed concern over starting a school in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.