बारामती, सातारासह शिरुर, रायगडवर दावा, अजित पवार यांनी फुंकले रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 12:24 PM2023-12-02T12:24:00+5:302023-12-02T12:24:25+5:30
Ajit Pawar: बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चारही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी लढवणार. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट ज्या जागांवर निवडणूक लढविणार आहे, त्या जागांवर जिथे राष्ट्रवादीची ताकद असेल तिथेही उमेदवार उभा करणार
मुंबई - बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चारही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी लढवणार. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट ज्या जागांवर निवडणूक लढविणार आहे, त्या जागांवर जिथे राष्ट्रवादीची ताकद असेल तिथेही उमेदवार उभा करणार असे जाहीर करत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील शिबिराच्या समारोपाच्या भाषणात शुक्रवारी त्यांनी ही घोषणा केली. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.
बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चारही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी लढवणार. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट ज्या जागांवर निवडणूक लढविणार आहे, त्या जागांवर जिथे राष्ट्रवादीची ताकद असेल तिथेही उमेदवार उभा करणार
मुलीही वंशाचा दिवा चांगला लावतात
आपल्याला पुढच्या पिढीसाठी एक विचार करावा लागेल, आता काहीही करून एक किंवा दोन अपत्यावर थांबायला हवे. त्यासाठी कायदा करावा लागला तरी तो पंतप्रधान मोदींनी करावा. मुलगा वंशाचा दिवा असतो असे काही नाही. मुलीही वंशाचा दिवा चांगला लावतात, असा काहींना अनुभव आहे, अशी टिपण्णीही अजित पवार यांनी केली.
माझ्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत
- काहीजण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले. मी कॅबिनेटमध्ये त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला टार्गेट केले गेले पण ते आरोप सिद्ध झालेले नाहीत.
- मंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ते आदेश दिले होते. माझ्यावर जे आरोप झाले त्या जलसंपदा विभागाचा कारभार त्यानंतर रेंगाळला. मी कामाला मान्यता देतो म्हणून मला टार्गेट करण्यात आले.
- त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी मला क्लीन चीट दिली. ३२ वर्षे मी काम करतोय मला विचारले जाते माझ्यावरच आरोप का होतात? परंतु मी कमिटमेंट पाळणारा नेता आहे, असेही अजित पवार म्हणाले.