भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे अनुपस्थित राहणार?; कोण-कोण सहभागी होणार वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 08:58 AM2022-04-25T08:58:48+5:302022-04-25T08:59:24+5:30

राज्यात भोंग्यांच्या प्रश्नावरुन राजकीय वातावरण तापलेलं असताना ठाकरे सरकारनं या प्रश्नावर आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

cm uddhav thackeray govt called meeting with all political party on loudspeaker controversy raj thackeray will not attend | भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे अनुपस्थित राहणार?; कोण-कोण सहभागी होणार वाचा...

भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे अनुपस्थित राहणार?; कोण-कोण सहभागी होणार वाचा...

googlenewsNext

मुंबई- 

राज्यात भोंग्यांच्या प्रश्नावरुन राजकीय वातावरण तापलेलं असताना ठाकरे सरकारनं या प्रश्नावर आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी लाऊडस्पीकरबाबत काही नियम केले आहेत. पण हा वाद अजूनही संपलेला नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतची मुदत दिली आहे. मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवू असं आव्हान राज ठाकरे यांनी दिलं आहे. पण ठाकरे सरकारनं आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे अनुपस्थितीत राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार आजच्या बैठकीला भाजपाकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसंच इतर काही पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रसारमाध्यमांना बैठकी संदर्भातील माहिती देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत भोंग्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

Web Title: cm uddhav thackeray govt called meeting with all political party on loudspeaker controversy raj thackeray will not attend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.