Maharashtra Politics : मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेविरोधात कोर्टात याचिका', भाजपाचा काँग्रेसवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 06:23 PM2024-08-29T18:23:20+5:302024-08-29T18:24:56+5:30
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. याआधी पावसाळी अधिवेशनात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे या योजनेविरोधात कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली. दरम्यान, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या याचिकेवरुन भाजपानेकाँग्रेसवर जोरदार आरोप केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी CM एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना केलं आवाहन
लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरुन आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव यांनी काँग्रेसवर टीका केली.'लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी, लाडकी बहिण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे असा घणाघात भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
काँग्रेसने महिला विरोधी चेहरा दाखवून दिला
या याचिकेमुळे काँग्रेसने आपला महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे, असंही उपाध्ये म्हणाले. उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , वडपल्लीवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत 'लाडकी बहीण योजना' बंद करण्याची मागणी केली आहे . काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहिण योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती . आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे.
'महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजून झुकेल तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस या ना त्या प्रकारे योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे', असंही यात म्हटले आहे.
काँग्रेस आणि विरोधकांच्या भुलथापांना सूज्ञ जनता बळी पडणार नाही
'राज्यातील माताभगीनी आणि मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य ,स्वावलंबन,पोषण आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही हे महायुती सरकारकडून वारंवार स्पष्ट करण्यात येत असूनही काँग्रेसकडून अपप्रचार केला जात आहे. विरोधाला विरोध करायचा या भूमिकेनुसार महिला हिताच्या या योजनेला आडकाठी करण्यात येत असून काँग्रेस आणि विरोधकांच्या भुलथापांना सूज्ञ जनता बळी पडणार नाही असंही उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे .
काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहिण योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी काँग्रेसनं लाडकी बहिण योजनेविरोधात कोर्टात धाव घेतली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे.
महाविकास आघाडी लाडकी बहिण… pic.twitter.com/MmJK0eH7mN— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 29, 2024