“ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा”; काँग्रेसचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:14 IST2025-04-02T16:14:06+5:302025-04-02T16:14:12+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

congress harshwardhan sapkal criticized mahayuti state govt over farmer loan waive off issue | “ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा”; काँग्रेसचे आव्हान

“ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा”; काँग्रेसचे आव्हान

Congress Harshwardhan Sapkal News: शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकार कडून विशेष पॅकेज आणावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेताच गुंडाळले. मोठी-मोठी भाषणे केली पण त्यांना त्यांच्याच जाहीरनाम्याचा विसर पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात नटसम्राट शिरला होता पण ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असे वर्णन अधिवेशनाचे करावे लागेल. जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून औरंगजेबाची कबर उकरून काढण्यात आली. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे. सरकारने जाणीवपूर्वक मुद्द्यांना बगल दिली, असा आरोप सपकाळ यांनी यावेळी बोलताना केला.

खडकपूर्णा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदाराला वाढदिवसाची भेट म्हणत त्यांनी सही करत सुप्रमा दिली होती पण आता ते होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली  आहे. याच पाण्याच्या प्रश्नावरून तरुण शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे, क्या हुआ तेरा वादा? अशी विचारणा जनता करत आहे, असेही सपकाळ म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षानंतर ३० मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयाला भेट दिली. आपली खूर्ची धोक्यात आल्यामुळेच नरेंद्र मोदी यांना आरएसएसची आठवण आली असावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

Web Title: congress harshwardhan sapkal criticized mahayuti state govt over farmer loan waive off issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.