इव्हीएमच्या सुरक्षेबाबत काँग्रेसला शंका, मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 02:26 PM2019-05-21T14:26:28+5:302019-05-21T14:27:19+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ आल्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ आल्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे इव्हीएमबाबत दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होत असतानाच मुंबईत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यासमोर शिवसेनेचे अरविंद सावंत यांचे आव्हान आहे. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देवरा यांनी या संदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. इव्हीएममध्ये फेरफार करता येऊ नयेत यासाठी स्ट्रॉग रूम आणि मतमोजणी केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी, अशी विनंती मिलिंद देवरा यांनी या पत्रामधून केली आहे.
Mumbai Congress President Milind Deora writes to Chief Electoral Officer, Maharashtra requesting "increase of vigilance, security etc at counting centers, so that EVM machines should not get tampered in any manner whatsoever" (file pic) pic.twitter.com/hxs4NRMaVt
— ANI (@ANI) May 21, 2019
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी मतदान झाले होते. दरम्यान, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.