महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 01:11 AM2019-09-26T01:11:11+5:302019-09-26T06:55:13+5:30

प्रजा संस्थेचे सर्वेक्षण : भाजपची कामगिरी तिसºया क्रमांकावर

The Congress has put behind the watchmen in the municipality | महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे

महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे

Next

मुंबई : महापालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसने पहारेकऱ्यांनाही मागे टाकले आहे. प्रजा या बिगर शासकीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसची कामगिरी अव्वल ठरली आहे. २०१७ मध्ये सत्तेवर पाणी सोडून पहारेकरी बनलेले भाजप नगरसेवक गेल्या दोन वर्षांत बघ्यांच्या भूमिकेत गेले असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

२०१७ ची महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविणाऱ्या शिवसेना आणि भाजपने जवळपास समान संख्याबळ मिळविले. राज्यातील सत्तेसाठी या स्पर्धेतून बाहेर पडत भाजपने महापालिकेत पहारेकऱ्यांची भूमिका स्वीकारली होती. पहिल्याच वर्षी भाजपने सत्ताधारी शिवसेनेच्या नाकात दम आणला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि भाजपचे पुन्हा सूर जुळून आल्याने पहारेकऱ्यांची तलावर म्यान झाली.

भाजपने विरोधी पक्षात बसणे नाकारल्यामुळे तिसºया क्रमांकावर असलेला काँग्रेस विरोधी पक्ष ठरला आहे. नगरसेवकांच्या कामगिरीत काँग्रेस पक्षाने एकूण ६१.९६ टक्के गुण मिळविले आहेत. मनसेचे सहा नगरसेवक पक्षात आल्यानंतर भक्कम झालेल्या शिवसेनेनेही काँग्रेसच्या मागोमाग ६१.६१ टक्के गुण मिळविले आहेत. भाजपने मात्र ५९.५४ टक्के गुण मिळवित तिसरा क्रमांक पटकावला़

शिवसेना नगरसेवकांनी मारली बाजी
सर्वोत्तम कामगिरीमध्ये शिवसेना नगरसेविकांनी बाजी मारली आहे. कुलाबा येथील शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी ८२.३० टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर दक्षिण मध्य मुंबईतील नगरसेविका किशोरी पेडणेकर (८१.२५ टक्के) या दुसºया तर भाजपच्या सेजल देसाई (७७.३३ टक्के) या तिसºया क्रमांकावर आहेत.

नगरसेविकांच्या कामगिरीत सुधारणा
वर्षभरात नागरी समस्यांबाबत आवाज उठवणाºया व चांगली कामगिरी असलेल्या सर्वोत्तम १० नगरसेवकांमध्ये सात नगरसेविकांचा समावेश आहे. २०१८ मध्ये चार नगरसेविका टॉप टेनमध्ये होत्या. महापालिकेत ५० टक्के आरक्षण असल्याने महिला नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी अनेक जणी केवळ नावापुरत्या पदावर असून त्यांचे कारभार वरिष्ठ नेते अथवा राजकारणात सक्रिय असलेले त्यांचे पती, भाऊ किंवा वडील चालवित असल्याचा आरोप होत असतो. परंतु, या सर्वेक्षणात सर्वोत्तम १० नगरसेवकांमध्ये सात महिला असल्याचे उजेडात आले आहे.

सर्वोत्तम कामगिरी : सुजाता पाटेकर(शिवसेना), किशोरी पेडणेकर (शिवसेना), सेजल देसाई (भाजप), कुमरजहाँ मोहम्मद सिद्दिकी (काँग्रेस), हरीश छेडा (भाजप), साक्षी दळवी (भाजप), समाधान सरवणकर (शिवसेना), मेहेर हैदर (काँग्रेस), सान्वी तांडेल (शिवसेना), सचिन पडवळ (शिवसेना).

२०१७ फेब्रुवारीमध्ये निवडणूक लढविताना नगरसेवकांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ३४ नगरसेवकांवर एफआयआर दाखल होता. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत सहा नगरसेवकांवर नवीन एफआयआर दाखल झाला. तर २० नगरसेवकांवर चार्जशिट दाखल करण्यात आली आहे.

मौनी बाबा...
सर्वांत कमी गुण मिळालेले व सभागृह, विविध समित्यांमध्ये आवाज न उठविणाºया नगरसेवकांच्या यादीत भाजपचे चार नगरसेवक आहेत. यामध्ये
गुलनाझ खुरेशी (एमआयएम)
आयशा बानो (समाजवादी)
सागर सिंह (भाजप)
प्रवीण शाह (भाजप)
पराग शाह (भाजप)
आयशा शेख (समाजवादी)
संजय अगलदरे (शिवसेना)
निकिता निकम (काँग्रेस)
सुनील यादव (भाजप)
परमेश्वर कदम (शिवसेना)

Web Title: The Congress has put behind the watchmen in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.