आरेच्या मूलभूत सुविधांसाठी भर पावसात कॉंग्रेसचे उपोषण

By मनोहर कुंभेजकर | Published: July 19, 2023 06:46 PM2023-07-19T18:46:53+5:302023-07-19T18:47:02+5:30

संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली नुकताच आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर अलीकडेच  मोर्चा सुध्दा काढण्यात आला होता

Congress hunger strike for basic facilities of Aarey in heavy rains | आरेच्या मूलभूत सुविधांसाठी भर पावसात कॉंग्रेसचे उपोषण

आरेच्या मूलभूत सुविधांसाठी भर पावसात कॉंग्रेसचे उपोषण

googlenewsNext

मुंबई- आरेतील झोपडपट्टी दुरुस्ती ,लाईट मीटर साठी परवानगी मिळावी, आरेतील अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था दूर करावी, तसेच मयूर नगर येथील दुकानदारांवर अन्यायकारक तोडक कारवाई,परवाना धारक तबेलेवर होत असलेल्या अन्याय बाबत व इतर प्रश्नांसाठी याबाबत आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी उत्तर पश्चिम जिल्हा कॉंग्रेस यांच्यावतीने आज सकाळ पासून गोरेगाव ( पूर्व) येथील आरे डेअरी समोर भर पावसात उपोषण आयोजित करण्यात आले होते.

मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा प्रा वर्षा गायकवाड ,माजी खासदार संजय निरुपम ,जिल्हा अध्यक्ष क्वाव्हई डायस ,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांच्या आदेशानुसार आरे डेयरी समोर आज सकाळी बेमुदत उपोषणाला सुरवात झाली.

या समस्यांबाबत संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली नुकताच आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर अलीकडेच  मोर्चा सुध्दा काढण्यात आला होता. मात्र आरेचे सीईओ आणि दुग्धविकास विभागाने समस्यांची दखल घेतली नसल्याबद्धल सदर  उपोषण आयोजित केल्याची माहिती मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी लोकमतला दिली.

या उपोषणाला सुनिल कुमरे,मुंबई एस सी विभाग कॉंग्रेसचे महासचिव जयराम मुरगन, ५२चे कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राहुल उगले,५३चे ब्लॉक अध्यक्ष सूरज गुप्ता,स्थानिक नागरिक हिरालाल सिंह,सुरेश चौधरी, बरकत शेख आदी बसले होते.

आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघचौरे
यांची उपोषणकर्त्यांनी भेट घेतली. पुरावे असलेली कोणतीही झोपडी तोडली जाणार नाही. तसेच लाईट मीटर साठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे व मयूर नगर येतील जी दुकाने तोडली गेली आहे त्यांनी १० दिवसात आपले पुरावे सादर करावे जेणेकरून योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपोषण कर्त्यांना दिले.त्यामुळे क्लाव्हई डायस यांच्या समोर उपोषण मागे घेण्यात आले अशी माहिती कुमरे यांनी दिली.

Web Title: Congress hunger strike for basic facilities of Aarey in heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.