"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:50 PM2020-08-18T16:50:23+5:302020-08-18T17:05:24+5:30

अमित शहा उपचारांसाठी एम्समध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

congress sachin sawant tweet on bjp amit shah hospitalised | "काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

googlenewsNext

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनावर मात करून घरी परतलेले असताना रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शहा उपचारांसाठी एम्समध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं, असा प्रश्न विचारतच अमित शहा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत असा टोला लगावला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी असं म्हटलं आहे. 

सचिन सावंत यांनी मंगळवारी (18 ऑगस्ट) आपल्या ट्विटर अकाऊंवरून याबाबतचे एक ट्विट केले आहे. "1956 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोष देत बाळ नरेंद्र यांनी स्थापन केलेल्या दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं असा प्रश्न ओरडून विचारतच अमित शहा हे उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी आम्ही प्रार्थना करतो" असं ट्विट सावंत यांनी केलं आहे.

सोमवारी रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याचे समजते. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते. एम्सने दिलेल्या माहितीनुसार अमित शहांना कोरोनानंतरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असून त्याचे कामही ते रुग्णालयामधून करत आहेत. शहा यांना थकवा आणि अंगदुखी होत होती.

एम्समध्ये डॉ. रणदीप गुलेरियां यांची टीम अमित शहांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. शहा यांना मध्यरात्री 2 वाजता रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी त्यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं ट्विट केलं. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! खेड्यापाड्यात पायी प्रवास करून 'हे' डॉक्टर्स करताहेत रुग्णांवर उपचार 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...

धक्कादायक! तब्बल 4 महिने आईच्या मृतदेहाजवळ बसून होती मुलगी

CoronaVirus News : देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन, महत्त्वाची माहिती येणार समोर

बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल

Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल

Web Title: congress sachin sawant tweet on bjp amit shah hospitalised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.