काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी दाखल केला पोक्सोचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 20:49 IST2018-07-03T20:48:27+5:302018-07-03T20:49:26+5:30
गोरेगाव पोलीस ठाण्यात ट्विटरवरून धमकाविणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात तक्रर

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी दाखल केला पोक्सोचा गुन्हा
मुंबई - काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या ट्विटर हॅण्डलवर धमकी देणाऱ्या तसेच अश्लील भाषेत ट्विट करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात प्रियांका यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गोरेगाव पोलिसांनी आयटी ऍक्ट आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जय श्री राम असे नाव असलेल्या आणि @girishk1605 या ट्विटर हॅण्डलहून काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना 'मला तुझ्या मुलीवर बलात्कार करायचा आहे, तिला माझ्याकडे पाठव' अशा आशयाचे ट्विट करण्यात आले होते. यावर अभिनेता फरहान अख्तरने देखील आश्चर्य व्यक्त करणारे ट्विट केले. आज यासंदर्भात प्रियांका यांनी अज्ञात इसमाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस याबाबत तपास करणार आहेत. आयटी ऍक्ट आणि पॉक्सो ऍक्ट अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What is going on? Who are these sick grotesque people? Disgusting!! Jail bhejo isko.. #enoughisenoughpic.twitter.com/NVT4bDtsdc
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) July 2, 2018