अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला 'हात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 11:30 AM2022-10-05T11:30:05+5:302022-10-05T11:31:10+5:30

शिवसेनेला पाठिंबा देण्याची नाना पटोलेंची घोषणा.

Congress supports shiv sena andheri vidhansabha byelections mumbai nana patole uddhav thackeray | अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला 'हात'

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला 'हात'

googlenewsNext

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात  देशात सर्वोत्तम काम केल्याचे पटोले म्हणाले. 

"सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील," असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Congress supports shiv sena andheri vidhansabha byelections mumbai nana patole uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.