देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर तणावाची परिस्थिती; काँग्रेस-भाजपा आमनेसामने, पोलीस बंदोबस्त वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:11 AM2022-02-14T11:11:51+5:302022-02-14T11:12:20+5:30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्ते पोहचले होते.

Congress workers' agitation outside Devendra Fadnavis's house, BJP workers also gathered. Adequate security of the police | देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर तणावाची परिस्थिती; काँग्रेस-भाजपा आमनेसामने, पोलीस बंदोबस्त वाढला

देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर तणावाची परिस्थिती; काँग्रेस-भाजपा आमनेसामने, पोलीस बंदोबस्त वाढला

Next

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी संसदेत दिलेल्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधानांनी केलेले विधान महाराष्ट्राची बदनामी करणारं आहे. त्यांनी माफी मागायला हवी अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतला आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयासमोर आंदोलन केले होते. आता राज्यातील प्रमुख भाजपा नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करु असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं होतं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्ते पोहचले होते. तेव्हा भाजपा कार्यकर्तेही फडणवीसांच्या घराबाहेर जमले. यावेळी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी फडणवीसांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. भाजपा कार्यकर्त्यांचीही पोलिसांना धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी सागर बंगल्याकडे जाणारे रस्ते दोन्ही बाजूने बंद केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवा, आंदोलन आम्हीही आक्रमक करु शकतो. तुम्हाला खासदारांच्या घरासमोर आंदोलन करायचे असेल तर उत्तर मुंबईतून सुरु करा असं आव्हान खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले आहे.

प्रसाद लाड यांनी दिला होता आक्रमक इशारा

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसला इशारा दिला होता. लाड म्हणाले होते की, नाना, तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतो. उद्या तू सागरवर ये, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्हीपण भाजपवासी नाही. पाहतो तू कसा परत जातो ते, अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिले होते. यावर काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रसाद लाड यांना प्रसाद लाड हे फडणवीसांच्या बंगल्यावरचा वॉचमन असल्याचं म्हणत आम्ही येणार, तुमच्याने जी गुंडगिरी करायची आहे ती करा, नाहीतरी भाजपा आता गुंडांचाच पक्ष झाल्याचा टोला लगावला होता.

नाना पटोले काय म्हणाले?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत कसे भाषण करतात? त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा भाजपाचे सदस्य बाके वाजवत होते. आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या घरापुढे आंदोलन करणारच. नरेंद्र मोदी यांनी माफी मागायला हवी अशी आमची मागणी आहे असं नाना पटोले म्हणाले.

Web Title: Congress workers' agitation outside Devendra Fadnavis's house, BJP workers also gathered. Adequate security of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.