coronavirus: विधान परिषद निवडणूक; काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने निवडणूक अटळ?  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 06:40 AM2020-05-10T06:40:46+5:302020-05-10T06:41:51+5:30

नऊ जागांसाठी आता दहा उमेदवार असतील. त्यामुळे कोणी माघार घेतली नाही, तर निवडणूक अटळ आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने दिलेले दोन्ही उमेदवार मराठवाड्यातील आहेत.

coronavirus: Legislative Council elections; Election inevitable as Congress fielded two candidates? | coronavirus: विधान परिषद निवडणूक; काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने निवडणूक अटळ?  

coronavirus: विधान परिषद निवडणूक; काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने निवडणूक अटळ?  

Next

मुंबई : विधान परिषदेच्या २१ मे रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जालना जिल्ह्यातील राजेश राठोड तर अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी अशा दोघांना उमेदवारी दिल्याने निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले.
नऊ जागांसाठी आता दहा उमेदवार असतील. त्यामुळे कोणी माघार घेतली नाही, तर निवडणूक अटळ आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने दिलेले दोन्ही उमेदवार मराठवाड्यातील आहेत. शिवाय, राठोड यांच्या नावाची घोषणा दिल्लीतून झाली, तर मोदी यांचे नाव प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले. शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे आणि प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा लढणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे मात्र उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. आज काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर 

 केले. त्यामुळे आता
ही निवडणूक रंगतदार वळण
घेणार असे दिसते. तसेच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने उमेदवारी दिलेले
राजेश राठोड हे माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे ते पुत्र आहेत. ते यापूर्वी जालना जिल्हा परिषदेत सदस्य राहिले आहेत. दांडगा जनसंपर्क आणि जालना जिल्ह्यात काँग्रेस रुजविण्यासाठी त्यांच्या वडिलांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फळ म्हणून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. शिवाय, बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देऊन सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्नकेला आहे.
पापा मोदी यांचे बीड जिल्'ातील आंबेजोगाई नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अमोल मिटकरी यांचे नाव निश्चित मानले जाते. दुसऱ्या जागेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि हेमंत टकले यांच्या नावाची चर्चा आहे.
विधान परिषदेच्या प्रत्येकी दोन जागा निवडून आणण्यासाठी शिवसेनेला केवळ दोन मतांची, राष्ट्रवादीला चार मतांची तर काँग्रेसला १४ मतांची गरज आहे. एक जागा निवडून आणण्यासाठी मतांचा कोटा २९ आहे. त्यामुळे सहा उमेदवार उभे करण्यासाठी १७४ मतांची गरज महाविकास आघाडीला आहे. सरकारने विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६९ मते मिळवली होती. शिवाय सीपीएम, एमआयएम आणि अपक्ष यांची आपल्याकडे मते आहेत असे सांगून काँग्रेसने स्वत:चे दोन उमेदवार उभे केले आहेत.
जर मतदान घेण्याची वेळ आलीच आणि कोरोनाच्या महामारीतही सरकारला निवडणुका महत्त्वाच्या वाटत आहेत असे म्हणत जर कोणी न्यायालयात गेले आणि न्यायालयाने स्थगिती दिली तर सरकारपुढेच मोठा प्रश्न उभा होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांना काही नेत्यांनी सांगितले होते, तरीदेखील काँग्रेसने २ उमेदवार उभे केल्यामुळे आता निवडणुका अटळ झाल्या आहेत.
स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही निवडणूक लढवत असल्यामुळे ही बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेनेकडून तसेच राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांनी दाद दिली नाही, असे सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीत गुप्त मतदान होते. काँग्रेसला दुसरी जागा निवडण्यासाठी जादाची जी १४ मते लागणार आहेत ती खेचून आणण्याची तयारी दर्शवल्याने पापा मोदी यांना संधी देण्यात आली असेही समजते. दुसºया जागेसाठी पूर्ण ताकद लावण्याचे काँग्रेस नेत्यांनी ठरवले आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न करू. उमेदवारी मागे घेण्यास वाव आहे .त्यादृष्टीने काँग्रेसशी चर्चा करू. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्याची परिस्थिती आहे का हेही बघू मात्र आजच्या परिस्थितीत निवडणूक बिनविरोध होणे सगळ्यांच्या हिताचे आहे.
- खा.संजय राऊत,
शिवसेना नेते

आमच्याकडे १७५ मते आहेत. एमआयएम, सीपीएम, आमच्यासोबत आहेत. अपक्षांमधील काहींनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहेच. त्यामुळे आमचे सहाच्या सहा उमेदवार विजयी होतील. आम्हाला तेवढा विश्वास आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा होऊनच हा निर्णय झालेला आहे.
- बाळासाहेब थोरात,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले आहेत असे आम्ही वाचले. मात्र पहिल्या पसंतीची कमी पडणारी मत काँग्रेस कुठून आणणार हे त्यांनी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत स्पष्ट करायला हवे. शिवसेना आणि राष्ट्रवादी दुस?्या पसंतीची मते त्यांना देऊ शकतील, पण पहिल्या पसंतीची मते कुठून येणार याची राजकीय आखणी काँग्रेसने सांगायला हवी. ती योग्य असेल तर आम्ही पूर्ण सपोर्ट करू.
- नवाब मलिक,
राष्ट्रीय प्रवक्ता, मंत्री, राष्ट्रवादी

Web Title: coronavirus: Legislative Council elections; Election inevitable as Congress fielded two candidates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.