'देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:54 AM2021-05-13T10:54:40+5:302021-05-13T11:44:02+5:30

काँग्रेस नेते आणि मुंबईतील काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता असलेल्या दत्तू गवाणकर यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे.

‘The country has only once again given Dr. 6 months. Give it to Manmohan Singh, congress leader tweet | 'देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या'

'देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या'

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारवर टीका होत आहे

मुंबई - देशात कोरोना महामारीचं मोठं संकट उभारलं असून परदेशी प्रसार माध्यमांनीही केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील विरोधी पक्षही सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्र्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उभा करत आहे. अनेकदा केंद्र आणि राज्य सरकार यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले होते. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही 12 सदस्यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.  

केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारवर टीका होत आहे. काँग्रेस नेते आणि मुंबईतील काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता असलेल्या दत्तू गवाणकर यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती द्या, मग बघा कशी सर्व स्थिती नियंत्रणात येईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. सुशिक्षित आणि अनपढ यांच्यातील फरक लक्षात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


 
राष्ट्रवादीनंही लगावला टोला

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना उद्रेकामुळे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. केंद्र सरकारने आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (coronavirus ncp nawab malik criticised pm modi and centre govt over corona situation)
 

मनमोहनसिंग यांनीही मोदींनी लिहिले होते पत्र

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील कोरोना परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या साथीला तोंड देण्यासाठी लसीकरण वाढवावे लागेल, असे त्यांनी यात म्हटले आहे. सिंग यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केवळ एकूण संख्या न बघता किती टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे हे बघायला हवे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण वाढवायला हवे. भारतात आतापर्यंत लोकसंख्येच्या छोट्याशा भागाचे लसीकरण झाले आहे. योग्य धोरणासह आम्ही या दिशेने वेगाने पुढे जाऊ शकतो. या साथीविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला खूप काही प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र, या प्रयत्नात मोठा भाग हा लसीकरण कार्यक्रम मजबूत करणे हाच असला पाहिजे. सिंग यांनी आपल्या पत्रात अनेक सूचना केल्या आहेत. 

Web Title: ‘The country has only once again given Dr. 6 months. Give it to Manmohan Singh, congress leader tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.