जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरबाबत हायकोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 06:26 AM2022-12-03T06:26:58+5:302022-12-03T06:27:24+5:30

सरकारची बाजू ऐकणार : उच्च न्यायालय

Court's important observation on Johnson & Johnson's baby powder, hearing on December 6 | जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरबाबत हायकोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरबाबत हायकोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलुंडच्या फॅक्टरीत उत्पादन करण्यात येणारी जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी टॅल्क पावडर वैधानिक आवश्यकतांशी सुसंगत आहे, असे प्रथमदर्शनी मत उच्च न्यायालयाने नोंदविले. १६ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने एफडीएला जॉन्सन अँड जॉन्सनच्या मुलुंड फॅक्टरीत उत्पादित केलेल्या बेबी टॅल्क पावडरचे नमुने तीन वेगवेगळ्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले होते. 

शुक्रवारी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस.जी. चपळगावकर यांच्या खंडपीठापुढे तिन्ही लॅबचे अहवाल सादर करण्यात आले. अहवाल वाचल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समध्य असलेल्या एफडीएच्या लॅबने अहवालात म्हटले आहे की, नमुन्यात सर्व घटक वैधानिक आवश्यकतांशी सुसंगत आहेत. तर इन्ट्राटेक लॅब (खासगी लॅब) ने प्रक्रियेनुसार रीडिंग स्थिर नाही, असे अहवालात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या लॅबने अहवालात म्हटले आहे की, पावडरचा नमुना घालून दिलेल्या नियमांना अनुसरून आहे.

सुनावणी ६ डिसेंबरला
तिन्ही लॅबच्या अहवालांच्या आधारे कंपनीला त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी खंडपीठापुढे केली. मात्र, न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. आम्हाला यावर सरकारची बाजूही ऐकायची आहे, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी ठेवली.

Web Title: Court's important observation on Johnson & Johnson's baby powder, hearing on December 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.