मुंबईतील डबेवाल्यांना घरं मिळणार, 'डबेवाला भवन'साठी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:48 PM2020-02-13T18:48:03+5:302020-02-13T18:49:10+5:30
मुंबईकरांना जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा
मुंबई - लंडनच्या राजाने मुंबईच्या डबेवाल्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर, मुंबईचा डबेवाला हा चित्रपट येताच, मुंबईचा डबेवाला महाराष्ट्रातील गावागावात पोहोचला. त्याच, डबेवाल्यांसाठी गेल्या 130 वर्षांपासून सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचं कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक, अभ्यासक येतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असायला हवी. त्यासाठी, मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचित केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुंबईकरांना जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा डबेवाला त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे साता-समुद्रापार पोहोचला आहे. त्यातूनच डबेवाल्यांकडून समाजाभिमूख कार्यातही सहभाग नोंदविण्यात येत आहे. त्यामुळेच, रोहित पवार यांनी डबेवाल्यांच्या प्रश्नाची आपुलकीने विचारपूस केली होती. आता, अजित पवार यांनी डबेवाल्यांच्या घरांसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी आमदार रोहित पवार यांनीही डबेवाल्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे त्यांच्यासमवेत लोकलने प्रवासही केला होता. त्यानंतर, अजित पवार यांच्याशी डबेवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणली होती.
गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचं कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक, अभ्यासक येतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असायला हवी. त्यासाठी, मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचित केले. pic.twitter.com/yUnGGu4DHD
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 13, 2020
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात डबेवाल्यांनी सहभाग नोंदवला होता. तर अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनातही त्यांनी आपला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला होता. तर, केरळच्या मदतीसाठी डबेवाला पुढे आला आहे. त्यामुळे मुंबईचा डबेवाला आता सर्वांनाच आपलासा वाटतो. रोहित पवार यांनीही डबेवाल्यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.