धोकादायक पुलांनी अडवली गणरायांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:04 AM2019-08-02T03:04:50+5:302019-08-02T03:04:58+5:30

पर्यायी मार्गाचा अभाव : पालिका, वाहतूक पोलीस पाहणीनंतर तोडगा काढणार

Dangerous bridges await republics | धोकादायक पुलांनी अडवली गणरायांची वाट

धोकादायक पुलांनी अडवली गणरायांची वाट

Next

मुंबई : गणरायांच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न असताना त्यात आता बंद पुलांची भर पडली आहे. धोकादायक ठरलेले मुंबईतील २९ पूल महापालिकेने बंद केले. परंतु, पर्यायी मार्ग नसल्याने दक्षिण मुंबईतील प्रमुख पुलांवरून जाणाऱ्या गणरायांचा मार्ग बिकट झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तक्रारींनंतर आता वाहतूक पोलीस आणि महापालिका अधिकारी संयुक्त पाहणी करून त्या भागातून गणरायांची मिरवणूक काढता येईल का? याबाबत निर्णय घेणार आहेत.

या वर्षी २ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. मात्र बहुतांशी मंडळे १५ दिवस आधीच गणेशमूर्ती मंडपात आणून ठेवतात.
त्रकरी रोड, चिंचपोकळी, घाटकोपर आणि जुहू तारा रोड असे काही महत्त्वाचे पूल धोकादायक ठरल्याने पालिकेने अवजड वाहनांना तिथे बंदी घातली आहे. मात्र गणेशमूर्ती तयार करणारे सर्वाधिक कारखाने परळ, लालबाग या परिसरात आहेत. त्यामुळे येथील पुलांवरून गणेशमूर्ती नेण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी समन्वय समिती, वाहतूक पोलीस, पालिका प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समन्वय समितीद्वारे मुंबईमधील धोकादायक पुलांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
त्यावर महापौरांनी वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या संयुक्त पाहणीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंडळांना
दिले.

असे आहे विघ्न....
गणेश आगमन तसेच विसर्जनाच्या दिनी मोठ्या मिरवणुका निघतात. त्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झालेले असतात. मार्च २०१९ मध्ये हिमालय पूल दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला. पालिकेने पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले असता, मुंबईमधील २९ पूल धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याचे समोर आले आहे. यापैकी आठ पूल पाडण्यात आले असून १२ पुलांचा वापर बंद करण्यात आला आहे. यापैकी करी रोड, चिंचपोकळी पुलावरून सर्वाधिक गणेश मूर्ती नेण्यात येतात.

१० आॅगस्टपूर्वी खड्डे बुजवणार
खड्ड्यांमुळे श्रीगणेशाच्या मूर्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता समन्वय समितीने उपस्थित केली. याची दखल घेऊन रस्त्यांवर पडलेले खड्डे १० आॅगस्टपूर्वी बुजविण्यात यावे, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे महापौरांनी सांगितले.

Web Title: Dangerous bridges await republics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.