Exclusive : 'त्या' दिवशी मी गोळ्या खावून झोपलो होतो, धनंजय मुडेंनी सांगितली नकोशी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 01:26 PM2021-11-27T13:26:18+5:302021-11-27T13:41:50+5:30
Exclusive : लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस कार्यक्रमांतर्गत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राजकारणाच्या पलीकडे उलगडण्यात आले.
मुंबई - राजकारणात आपल्या भाषण शैलीने आणि संघटन कौशल्याने राज्याच्या विरोध पक्षनेतेपदाची आणि आता मंत्रीपदाची जबाबदारी मिळवणाऱ्या धनंजय मुडेंनी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से मनमोकळेपणे शेअर केले. त्यातच, राजकीय जीवनात काम करताना, ती गोष्ट घडायला नको होती, अशी आयुष्यातील नकोशी घटनाही त्यांनी सांगितली. तसेच, शालेय जीवनापासून ते खाण्याच्या आवडीनिवडी व वेबसिरीजपर्यंत त्यांनी लोकमतशी गप्पा मारल्या.
लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस कार्यक्रमांतर्गत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राजकारणाच्या पलीकडे उलगडण्यात आले. काका गोपीनाथ मुंडे, बहिण पंकजा मुंडे आणि वडिल पंडित अण्णा मुंडेंसमवेतच्या अनेक आठवणी धनंजय मुंडेंनी या कार्यक्रमात जागवल्या. राजकीय जीवनात कायम मनाला टोचणारी गोष्टही त्यांनी सांगितली. महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेच्या शपथविधीतून
आदल्यादिवशी आम्ही सगळेचजण सोबत होतो, माझा सलग 8-10 दिवस प्रवास झाला होता. त्यामुळे, दुसऱ्यादिवशी आराम करायचा असं मी ठरवलं होतं. म्हणून मी बंगल्यावर ना जाता, माझ्या मित्राच्या फ्लॅटवर काही गोळ्या घेवून आराम करत होतो, झोपलो होतो. त्यामुळे, दुसऱ्यादिवशी असं काही घडेल, हे माहिती नव्हतं. त्यादिवशी मी दुपारी 1-2 च्या सुमारास झोपेतून उठलो. पण, तोपर्यंत इकडं खूप काही घडून गेलं होतं, एवढं झालं, त्यामध्ये माझ्यावरही मोठी टीका झाली. मी कोणासोबत आहे, मी कुठंय यावरुन टीका झाली, हे घडायला नको होतं, असे धनंजय मुंडेंनी सांगितलं. तसेच, मी गोळ्या घेवून झोपायला नको होतं, तो दिवस टाळला असता तर चांगलं झालं असतं, असे म्हणत आयुष्यात सतत बोचणारी राजकीय घटना धनंजय मुंडेंनी सांगितली.
पंकजाताई आणि माझं खूप चांगलं जमत होतं
बहीण-भावंडांमध्ये पंकजाताई आणि माझं जेवढं जमत होतं. मला वाटत नाही की, अन्य कुणाचं जमत होतं किंवा जमलं असेल. सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांना मनमोकळेपणाने सांगायचो. खुलेपणाने शेअर करायचो. सन २००९ पर्यंत आमचे फार चांगले संबंध होते. मात्र, त्यानंतर काही फारसं चांगलं राहिलं नाही. अनेकदा मीही प्रयत्न केला. माझे वडील गेल्यानंतर तसेच गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला. घर एकत्र ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केला. मात्र, त्यात मला यश आलं नाही. भलेही तुम्ही राजकारण वेगवेगळं करा. पण घर एकत्र ठेवून त्या पद्धतीने काही करता येतं का, यासाठी प्रयत्न केले, असं धनंजय मुंडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडेंना दिला सल्ला
पंकजा मुंडे या बहिण म्हणून खूप चांगल्या आहेत, आमचं बहिणी भावाचं नातं अतिशय चांगलं, हा त्यांच्यातील आणि आमच्या नात्यातील चांगला गुण आहे. मात्र, आपण ज्यांचा राजकीय वारसा चालवतोय, त्यांचा विचार केल्यास, एवढा उथळपणा नसावा हा सल्ला धनंजय मुंंडेंनी पंकजा मुंडेंना दिला.