CM अन् आम्ही दोन DCM एकत्र बसणार होतो, पण...; तेव्हा काय झालं?,अजितदादांनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:01 PM2024-01-18T15:01:28+5:302024-01-18T15:20:27+5:30
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये एकाच गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाटीवाटीने बसल्याचं पाहायला मिळत आहे.
सदर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ठरले होते. कोण कोणत्या गाडीत बसायचे. मुख्यमंत्री आणि आम्ही दोन उपमुख्यमंत्री एकत्रीत बसणार होतो. पण आमचे सहकारी आले. त्यांना जागा दिली. आम्ही रुबाब करणारी माणसं नाही, आम्ही सगळ्यांना सामावून घेणारे आहोत, असं अजित पवारांनी सांगितले. आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही दाटीवाटीणं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत. तेव्हा त्या गोष्टीला फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच दुर्दैवानं जे कोणी तो व्हिडीओ व्हायरल करतायेत त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. विकासावर बोला ना, त्यावर कुणी बोलत नाही. पण आम्ही दाटीवाटीनं बसलोय याचा आम्हाला नाही तर त्यांनाच जास्त त्रास होतो. आम्हाला त्रास झाला की नाही हे आमचं आम्ही ठरवू. हा व्हिडीओ आमच्या काही जवळच्यांनी मनावर घेतलाय त्यांना त्यांना शुभेच्छा, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला.
पाहा व्हिडीओ-
जर केली नसती सुरत गुवाहाटी
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) January 17, 2024
तर कशाला झाली असती दाटीवाटी..!!!!#goodmorningpic.twitter.com/MFkKanbiFm