कलम ३७० हटवणं चांगली बाब, तर समान नागरी कायद्याबाबत अजित पवार; म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:48 PM2023-07-15T12:48:22+5:302023-07-15T12:52:49+5:30
यावेळी त्यांनी देशभरात चर्चेत असलेल्या समान नागरी कायद्यावरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई- २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पवार त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरात चर्चेत असलेल्या समान नागरी कायद्यावरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट आम्ही छगन भुजबळ साहेबांनी सगळ्यांनी पाहिल्यानंतर आमची भूमिका मांडू. अजून ड्राफ्टच आलेला नाही, ही फक्त चर्चाच सुरू आहे. इथून पुढे आम्ही काम करताना संविधानाचा आदर करताना सगळ्या जाती धर्माला पुढ घेऊन जात असताना कोणवरही अन्याय होणार नाही. या भूमिकेच आम्ही सरर्थन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात चांगलं काम केलं आहे.
'समान नागरी काद्याचा ड्राफ्ट आल्यानंतर तो पाहून आम्ही आमची भूमिका मांडू. कायद्यात कोणतीही अडचण असेल तर आम्ही अडचण मांडू. चर्चा करुन ती अडचणही दूर करता येते. कोणालाही वंचित ठेवता येणार नाही, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
'मनाची साद ऐकून...; शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
'३७० कलम काढलं, चांगली गोष्ट झाली. तसाच समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट जर संपूर्ण देशाच्या भल्याचा असेल, तर विचार करू, असंही पवार म्हणाले.
....म्हणून सिल्वर ओकवर गेलो
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अंतर्मनाची साद ऐकून सिल्वर ओकवर गेलो. राजकारण वेगळं मात्र परिवार वेगळा. काल काकींचं ऑपरेशन होतं. त्यांच्या हाताला दुखापत झाली होती, काल दिवसभर माझं काम सुरू होतं. यानंतर मी सुप्रिया सुळे यांना फोन केला. तर त्यांनी मला सिल्वर ओकवरच बोलावलं. मला काकींना भेटायचं होतं, म्हणून मी सिल्वर ओकवर गेलो होतो. यावेळी शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळेही तिथे उपस्थित होत्या.
यावेळी सिल्वर ओकवर आमच राजकारणावर कोणतही बोलणं झालेलं नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार वेगळा असतो. आम्हाला आजी, आजोबांनी हे शिकवलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.