'आम्ही अजित पवारांच्या सरकारपेक्षा चांगला निर्णय घेऊ'; ओला दुष्काळाबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 03:16 PM2022-07-26T15:16:15+5:302022-07-26T15:16:54+5:30

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis explained that help will be provided to the farmers soon. | 'आम्ही अजित पवारांच्या सरकारपेक्षा चांगला निर्णय घेऊ'; ओला दुष्काळाबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण

'आम्ही अजित पवारांच्या सरकारपेक्षा चांगला निर्णय घेऊ'; ओला दुष्काळाबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण

Next

मुंबई- विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी व पूरामुळे झालेलं शेतजमिन आणि पिकांचं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन तातडीने बोलवण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केली होती.

अजित पवारांच्या या मागणीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात चर्चा झाली. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे. थोड्या दिवसांनी पुन्हा आढावा घेऊ, कारण हा निर्णय एकत्र जाहीर करावा लागतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 

तसेच अजित पवारांच्या सरकारने जो काही निर्णय घेतला होता, त्यापेक्षा अधिक चांगला निर्णय कसा घेता येईल, यासाठी प्रयत्न करु, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना लवकरच मदत पुरवणार असल्याचं स्पष्टीकरणही देवेंद्र फडणवीसांनी दिलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाऊसाने जमिनी वाहुन गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली असून स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पाऊसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत, असं अजित पवार पत्रात म्हणाले होते.

पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने व आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये व राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी मागणीही अजित पवारांनी केली होती.

दरम्यान, राज्यात स्थापन झालेल्या शिंदे सरकारकडून मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. मात्र असं करण्याचं काहीच कारण नव्हतं. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकार येत असतात आणि जात असतात. आता हे दोघे आलेत ते ताम्रपट घेऊन आलेत काय? हेही कधीतरी जाणारच आहेत, अशी टीकाही अजित पवार यांनी केली होती. 

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis explained that help will be provided to the farmers soon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.