अजितदादा खरंच आजारी आहेत?;फडणवीस म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत बोललो तेव्हा, आवाजही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:51 PM2023-10-04T13:51:21+5:302023-10-04T13:52:20+5:30

अजित पवार मंगळवारी मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis informed that Deputy Chief Minister Ajit Pawar is ill | अजितदादा खरंच आजारी आहेत?;फडणवीस म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत बोललो तेव्हा, आवाजही...'

अजितदादा खरंच आजारी आहेत?;फडणवीस म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत बोललो तेव्हा, आवाजही...'

googlenewsNext

मुंबई: अजित पवार आमच्यासोबत आल्यानं आमच्या जबाबदाऱ्या विभागल्या गेल्या आहेत. राजकारणात नेहमीच राजकीय ताकद अधिक संघटित करावी लागते, ती वाढवावी लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत आल्यानंतर आमचे सरकार चांगले चालले होते. पण राजकारणात नेहमी राजकीय ताकद वाढत असेल तर त्याला नाकारता येत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी सांगितले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

अजित पवार मंगळवारी मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला. संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा अधिकच गडद झाली. मात्र अजित पवार आजारी असल्यामुळे बैठकीत सामील झाले नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांच्या घशात जंतुसंसर्ग झाल्याने त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ते बैठकांना हजर नव्हते, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं. 

सदर मुलाखतीत देखील अजित पवार नाराज का आहेत?, ते खरंच आजारी आहेत का?, असे प्रश्न विचारले. यावर फडणवीस म्हणाले की, आजची राजकारणातील परिस्थिती इतकी बिकट आहे की, आपण आजारी पडलो तरी बातम्या होतात आणि त्यातून विविध प्रकारचे संदेशही पाठवले जातात. मी अजित पवारांसोबत बोललो, त्यावेळी त्यांचा आवाजही निघत नव्हता. त्यांना बोलायला त्रास होतोय, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेसोबत (शिंदे गट) आमची नैसर्गिक युती आहे. तर अजित पवार आमचे राजकीय साथीदार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. तसेच अजित पवारांनीही आता साथ दिल्यानं आमची ताकद आणखी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आमची आमची राजकीय केमिस्ट्री मजबूत आहे. मात्र आता अजित पवार देखील आमच्यासोबत आल्यानं राजकीय अंकगणितही चांगले झाले आहेत, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis informed that Deputy Chief Minister Ajit Pawar is ill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.