महाराष्ट्रात ८ लाख ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 07:55 PM2024-01-12T19:55:26+5:302024-01-12T20:00:45+5:30

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

Development works worth Rs 8 lakh 35 thousand crore started in Maharashtra; Information given by Eknath Shinde | महाराष्ट्रात ८ लाख ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

महाराष्ट्रात ८ लाख ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

मुंबई: देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग सुरू झाला आहे. कोरोना असताना देखील काम केले योग्य वेळेत काम पूर्ण झाले, आता २० मिनिटात रायगड जिल्ह्यात पोहचू शकतो. त्यामुळे इंधन आणि वेळ वाचेल असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

महाराष्ट्रात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु असून आपल्याकडून जे प्रस्ताव केंद्रात जातात, ते मंजूर होतात. महाराष्ट्राची विश्वासार्हता वाढत असून गुंतवणुकदारांचा देखील गुंतवणुकीसाठी प्रतिसाद वाढला आहे. राज्यात सुमारे ८ लाख ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रगती करत आहे. गेल्या नऊ वर्षांत आपण अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत. जगातील अनेक देश आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांशी लढत आहेत, तर आपला भारत मजबूत आणि संतुलित नेतृत्वामुळे आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा असून अटल सेतूचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांचे एकनाथ शिंदे यांनी आभारही मानले. 

Web Title: Development works worth Rs 8 lakh 35 thousand crore started in Maharashtra; Information given by Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.