विखे-पाटलांना शरद पवार देणार धक्का, नगरमध्ये भाजपाचा आणखी एक बडा नेता लागला गळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 02:00 PM2024-08-27T14:00:34+5:302024-08-27T14:10:35+5:30

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू आहेत, मागील आठवड्यात समरजीत घाटगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

Discussions are going on that BJP leader Vivek Kolhe will join Sharad Pawar group | विखे-पाटलांना शरद पवार देणार धक्का, नगरमध्ये भाजपाचा आणखी एक बडा नेता लागला गळाला

विखे-पाटलांना शरद पवार देणार धक्का, नगरमध्ये भाजपाचा आणखी एक बडा नेता लागला गळाला

Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीनेही तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आता खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांनीही आपले राजकीय डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मागील आठवड्यात कागल येथील भाजपा नेते समरजीतसिंह घाडगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले, तर आता भाजपाला अहमदनगरमध्येही मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. 

"महाराष्ट्रातील जनता सरकार पाडून उत्तर देईल", अखिलेश यादवांची भाजपवर आगपाखड

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले विवेक कोल्हे आज खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. अहमदनगर येथील भाजपाचे नेते विवेक कोल्हे गेल्या काही दिवसापासून पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, दरम्यान, आता विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच विवेक कोल्हे आज खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांची पुण्यात भेट घेणार आहेत. ( Latest Marathi News )

लोकसभेतील धक्क्यानंतर, ३ पक्ष आणि महायुती सरकारने उचललेल्या पावलांमुळे वातावरण फिरतंय किंवा फिरेल, असं वाटतं का?

हो, महायुतीला फायदा होऊ शकतो (345 votes)
नाही, वातावरण फिरताना दिसत नाही (505 votes)

Total Votes: 850

VOTEBack to voteView Results

नगरमध्ये भाजपाला धक्का बसणार?

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या बैठकीच्या निमित्ताने विवेक कोल्हे आणि खासदार शरद पवार यांची भेट होणार आहे. या भेटीत राजकीय चर्चा होऊ शकतात असं बोललं जात आहे. 

काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटल्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजपा नेते विवेक कोल्हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.  

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील शरद पवारांची भेट घेणार

दुसरीकडे, भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आज खासदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनीही भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे, पण अजित पवार गटाचे विद्यमाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळे या उमेदवारीला अडचण होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे.

Web Title: Discussions are going on that BJP leader Vivek Kolhe will join Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.