अपात्रतेची सुनावणी पितृपक्षात, ठाकरे गटाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी शिंदे गटाला १० दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 07:45 AM2023-09-15T07:45:14+5:302023-09-15T07:45:42+5:30

Politics: तब्बल पाच महिन्यांनी सुरू झालेली शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी तब्बल १७ दिवस लांबणीवर पडली. ठाकरे गटाकडून तत्काळ निर्णय देण्याची मागणी केली असता, ठाकरे गटाच्या याचिकाच न मिळाल्याचा दावा शिंदे गटाने केला.

Disqualification hearing in Pitrupaksha, 10 days for Shinde group to respond to Thackeray group's petition | अपात्रतेची सुनावणी पितृपक्षात, ठाकरे गटाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी शिंदे गटाला १० दिवस

अपात्रतेची सुनावणी पितृपक्षात, ठाकरे गटाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी शिंदे गटाला १० दिवस

googlenewsNext

मुंबई :  तब्बल पाच महिन्यांनी सुरू झालेली शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी तब्बल १७ दिवस लांबणीवर पडली. ठाकरे गटाकडून तत्काळ निर्णय देण्याची मागणी केली असता, ठाकरे गटाच्या याचिकाच न मिळाल्याचा दावा शिंदे गटाने केला. अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनीही हा दावा मान्य करीत याचिकेवर १० दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले. कागदपत्रांच्या छाननीसाठी ७ दिवसांचा कालावधी राखून ठेवला. त्यामुळे पुढील सुनावणी गणेशोत्सवानंतरच होणार आहे.

-  शिंदे गट : आम्हाला ठाकरे गटाकडून दाखल झालेल्या याचिकांसंदर्भातील कागदपत्रे मिळालेली नाहीत. 
- ठाकरे गट : याचिका विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडे दाखल केल्या आहेत. कागदपत्रे देण्याची जबाबदारी त्यांची आहे.
- शिंदे गट : याचिका दाखल करताना ठाकरे गट अध्यक्षांसमोर कागदपत्रे सादर न करता सर्वोच्च न्यायालयात गेले.
-  ठाकरे गट : आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या. व्हिपचे उल्लंघन केलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना निलंबित करण्याशिवाय पर्याय नव्हता; मात्र वेळकाढूपणा करण्यात आला. त्यामुळे थेट न्यायालयात गेलो.
-  शिंदे गट : तीन महिन्यांत निकाल द्यावा, असे कुठेही न्यायालयाने निर्देश दिलेले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या याचिका केल्याने वेळ लागू शकतो.
- ठाकरे गट : वेगवेगळ्या ठिकाणी ४१ याचिका दाखल आहेत. त्यांचा विषय एकच आहे. शेड्यूल १० नुसार त्या एकत्र कराव्यात. कर्नाटक अध्यक्षांनी जो निर्णय घेतला त्याची ऑर्डर बघावी. जास्तीत जास्त ७ दिवसांत सुनावणी संपवून निर्णय द्या. आम्ही पुन्हा तुमच्याकडे रिव्ह्यूसाठी येणार नाही.
-  शिंदे गट : गणेशोत्सव असल्याकारणाने आम्हाला दोन आठवड्यांचा वेळ द्यावा, त्यानंतर आम्ही अभ्यास करून उत्तर पाठवू.
- ठाकरे गट : गणेशोत्सवाचे निमित्त नको, तातडीने निर्णय द्यावा.

Web Title: Disqualification hearing in Pitrupaksha, 10 days for Shinde group to respond to Thackeray group's petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.