Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 02:29 PM2024-06-17T14:29:29+5:302024-06-17T14:40:35+5:30

Sanjay Nirupam on EVM Hack Controversy मुंबईतील अमोल किर्तीकर यांच्या पराभवानंतर माध्यमात आलेल्या एका बातमीमुळे EVM बाबत अनेक प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केले, त्यानंतर आता या प्रकरणावरून शिवसेनेनं विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

EVM Hack Controversy: Rahul Gandhi and Uddhav Thackeray should apologize; Shiv Sena leader Sanjay Nirupam demand | Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार

Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी गांधी-ठाकरेंवर हल्लाबोल केला. या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम बोलत होते.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर ४८ मतांनी विजय झाला. मात्र विरोधकांनी या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात संजय निरुपम यांनी  पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, इंडिया आघाडीतील सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रातील खोटी बातमी पोस्ट केली. त्या सर्वांनी माफी मागायला हवी. जर वृत्तपत्राने माफी मागितली आहे तर आदित्य ठाकरेंनीही माफी मागायला हवी. निवडणूक आयोगाकडून पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडत असताना एका वृत्तपत्राच्या खोट्या बातमीचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या निकालावर चुकीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी असं त्यांनी म्हटलं. 

तसेच ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. जर ईव्हीएम हॅक होऊ शकते मग काँग्रेसच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का? सुमारे एक लाख मतांची मोजणी शिल्लक असताना उबाठागटाचे अमोल किर्तीकर विजयी झाले अशी बातमी संध्याकाळी ५.४० वाजता कशी व्हायरल होते? असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मतमोजणीवेळी तिथे मोबाईल घेऊन जाणाऱ्या विरोधात वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार निवडणूक अधिकारी यांनी केली आहे. त्याबाबत चौकशी व कारवाई व्हावी. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न उबाठाकडून केला जात आहे. खोट्या बातमीमुळे पोलीस, निवडणूक अधिकारी यांना बदनाम केले गेले. आमच्या पक्षाचीही बदनामी झाली त्याबद्दल न्यायालयात दाद मागण्याबाबत पक्ष प्रमुख ठरवतील असंही संजय निरुपम यांनी सांगितले. 

सामना आणि रश्मी ठाकरे यांनी माफी मागावी

सामनात आज पुन्हा एक खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. सामानाच्या संपादक रश्मी ठाकरे आहेत. यांसदर्भात सामनाने जाहीर माफी मागितली नाही, तर प्रेस काऊन्सिलकडे दाद मागू, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला. मातोश्री २ ही फेक नरेटिव्हची फॅक्ट्री आहे आणि त्याचे कारकून संजय राऊत आहेत अशी टीकाही निरुपम यांनी केली.
 

Web Title: EVM Hack Controversy: Rahul Gandhi and Uddhav Thackeray should apologize; Shiv Sena leader Sanjay Nirupam demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.