निवडणूक अधिकारी प्रथमच प्रतिवादी, न्यायालयात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:56 AM2019-04-04T05:56:41+5:302019-04-04T05:57:07+5:30
न्यायालयात याचिका : अधिकाऱ्यांचा होतोय दुरूपयोग?
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या एका आदेशामुळे भाजपाकडून निवडणुकीत अधिकाऱ्यांच्या दुरूपयोगाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. गुजरातमधील डोलका विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे भूपेंद्र सिंह यांना सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केली गेली असा आरोप करून दाखल झालेल्या याचिकेवर पहिल्यांदाच निवडणुकीशी संबंधित अधिकाºयांना प्रतिवादी केले गेले आहे.
गुजरातेत २०१७ मध्ये झालेल्या डोलका विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केली जात होती तेव्हा पर्यवेक्षक विनिता व्होरा आणि धवलजानी (हे डोलकाचे उपजिल्हाधिकारीही होते) यांनी भाजप सरकारमध्ये कायदा मंत्री असलेले भूपेंद्रसिंह यांची मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीकडे दुर्लक्ष करून निवडणूक निकाल प्रभावीत करण्यासाठी काम केल्याचा आरोप होता.
या प्रकरणी न्यायालयाचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. परंतु, उच्च न्यायालयाने भारतीय प्रशासन सेवेतील व्होरा आणि धवलजानी यांना ज्या प्रकारे प्रतिवादी करण्याचा निर्णय घेतला त्यावरून भाजपकडून या अधिकाºयांचा वापर केला जात होता याचे स्पष्ट संकेत मिळतात.
काँग्रेसचे नेते शक्तिसिंह गोहील यांनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत अधिकाºयांचा वापर करण्याची ही काही पहिली घटना आहे, असे नाही असा आरोप केला. यावरून अशी शंका निर्माण झाली आहे की, संसद व विधानसभा मतदारसंघांत भाजपने अधिकाºयांचा असाच दुरूपयोग केला असावा. निवडणूक अधिकारी धवलजानी यांना न्यायालयाने विचारले की, तुम्ही निवडणूक आयोगाच्या हँडबुकच्या नियमांनुसार टपाल मतपत्रिकांची पुन्हा पडताळणी (व्हेरिफिकेशन) केली होती का याचा त्यांनी इन्कार केला. अशा मतांची फेरमतमोजणी आवश्यक आहे, असे हँडबुकमध्ये म्हटले असल्यामुळे तुम्ही ती केली का, असे विचारल्यावर धवलजानी म्हणाले की, मी ना पुन्हा तपास केला ना फेरमतमोजणी.
मतमोजणीवेळी बोलत होता फोनवर...
च्भलेही कोणी मागणी केलेली नसेल तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार असे करणे निवडणूक अधिकाºयासाठी गरजेचे आहे, अशी आठवण न्यायालयाने करून दिली. धवलजानी मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोनवर बोलताना न्यायालयाला आढळले व ही बाब त्यांनी मान्य केली. त्यानंतर अशा अनेक गोष्टी बाहेर आल्या की, भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी हा अधिकारी (धवलजानी) काम करीत होता. च्गोहील यांचा थेट आरोप आहे की, मतमोजणी सुरू असताना धवलजानी भूपेंद्रसिंह यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते व शेवटी भूपेंद्रसिंहयांचा ३२७ मतांनी विजय झाल्याचे जाहीर केले गेले. गोहील यांनी असा प्रश्न विचारला की, टपालाद्वारे १३५६ मते मिळाली व त्यातील ४२९ मतपत्रिका भाजपचा उमेदवार सहजपणे जिंकावा म्हणून रद्द केल्या.
च्लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पायरीवर निवडणुकीशी संबंधित असलेल्या अधिकाºयांचा दुरूपयोग होऊ नये याची काळजी घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.