राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ‘फ्लॉप’; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 06:23 AM2019-09-21T06:23:47+5:302019-09-21T06:24:03+5:30

देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी दिल्याचा भाजप-शिवसेना सरकारचा दावा खोटा ठरला आहे.

'Flop' loan scheme announced by the state government; Congress alleges | राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ‘फ्लॉप’; काँग्रेसचा आरोप

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ‘फ्लॉप’; काँग्रेसचा आरोप

Next

मुंबई : देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी दिल्याचा भाजप-शिवसेना सरकारचा दावा खोटा ठरला आहे. निम्म्याहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचा दावा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
गांधीभवन येथील पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करून २७ महिने झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणलेल्या या कर्जमाफी योजनेचा मोठा गाजावाजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने केला. या योजनेची अंतिम आकडेवारी समोर आली असून सरकारचे दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत एकूण ४४ लाख ४ हजार १४७ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८ हजार ७६१ कोटी ५५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याचाच अर्थ जवळपास ४५ लाख शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत. कर्जमाफीच्या रकमेचा आकडाही ५० टक्क्यांच्या आसपासच आहे. योजनेबाबतच्या तक्रारीनंतर सरकारने जाहीर केलेली एक वेळ समझोता योजनासुद्धा धूळफेक ठरली आहे. याअंतर्गत केवळ ४ लाख २६ हजार ५८८ शेतकºयांना २ हजार ६२९ कोटी देण्यात आले आहेत. यात ६ लाख पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत.
‘सरसकट कर्जमाफी देऊ’
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कर्जमाफीच्या नावाखाली युती सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास सरसकट कर्जमाफीचे आश्वासनही सावंत यांनी या वेळी दिले. कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत ग्रीन लिस्टमध्ये ५५ लाख ६० हजार ८१६ शेतकºयांसाठी २६ हजार ४५६ कोटी ६९ लाख रुपयांची कर्जमाफी सांगण्यात आली होती. या यादीचा अर्थ हा की अधिकृतपणे ८९ लाखांपैकी जवळपास ३४ लाख शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे. अधिकृत पात्र शेतकºयांची यादी घोषित करूनही जवळपास ८ हजार कोटींची कर्जमाफी मिळालेलीच नाही. २७ महिने कर्जमाफीचे घोंगडे भिजत ठेवण्यात आले. कमीत कमी शेतकºयांना लाभ मिळेल याकडे सरकारचा कल होता. बँकांवर आरोप करणारे सरकार बँकांच्या घोटाळ्याबद्दल रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करायला मात्र तयार नाही, असा आरोपही सावंत यांनी केला.

Web Title: 'Flop' loan scheme announced by the state government; Congress alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.